Weather Update: चार राज्यात धो-धो बरसणार; हवामान विभागाकडून मोठी अपडेट,महाराष्ट्रात काय असेल स्थिती?

Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने चार राज्यांसाठी सोमवारीसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांतही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
IMD orange alert states and Maharashtra weather forecast
IMD orange alert states and Maharashtra weather forecast
Published On
Summary
  • मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

  • विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

  • विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता

हवामान विभागाने चार राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तसेच इतर अनेक राज्यांतही मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचे प्रमाण राहण्याचा अंदाज आहे.

IMD orange alert states and Maharashtra weather forecast
Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, १३ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी ; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

सोमवारसाठी हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तसेच आसाम, मेघालय, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, झारखंड आणि उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी,बिहार, झारखंड, ओडिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, तसेच उत्तर पूर्व भागातील राज्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD orange alert states and Maharashtra weather forecast
Dolphin cyclone : 216 किमी वेग, २ देशांत इमर्जन्सी- हायअलर्ट, डॉल्फिन चक्रीवादळ किती भयावह? भारतावर काय परिणाम होणार? वाचा

दिल्ली-एनसीआरमध्ये कसं असणार हवामान

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारतीय हवामान विभागाने (IMD) हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांतही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये सर्वत्र पावसाची शक्यता आहे तसेच किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com