IMD Weather Update: उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट, अनेक शहरे धुक्यात हरवली; शाळांना सुट्टी जाहीर

Weather Updates in India: मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळल्याने उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. परिणामी अनेक शहरांवर धुक्याची चादर पसरली असून रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.
IMD Weather update
IMD Weather update Saam TV
Published On

देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळल्याने उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. परिणामी अनेक शहरांवर धुक्याची चादर पसरली असून रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.

हीच बाब लक्षात घेता काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरं सध्या धुक्याच्या विळख्यात आहेत. पुढील तीन दिवस धुके आणि थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IMD Weather update
Maharashtra Corona Update: मुंबईत दोन दिवसांत कोरोनाचे ३८ नवे रुग्ण; महाराष्ट्रात काय परिस्थिती? वाचा...

धुके आणि थंडीमुळे काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून काही ठिकाणी वेळेत बदल करण्यात आला आहे. गाझियाबादमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

२८ डिसेंबरपासून शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या संदर्भात मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. मथुरेत शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सध्या शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

अलिगडमध्येही थंडीमुळे पुढील दोन दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यूपी बोर्ड ते सीबीएसई, आयसीएसई बोर्डापर्यंतच्या शाळा २९ डिसेंबरपर्यंत बंद राहतील. त्याचप्रमाणे, जालौनमध्येही पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहतील.

उत्तर प्रदेशातील एटामध्येही २८ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी प्रेम रंजन सिंह यांनी थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, खराब हवामानाचा परिणाम दिल्ली विमानतळावरील उड्डाणांवरही दिसून येत आहे . बुधवारी दिल्ली विमानतळावरून किमान ९ उड्डाणे वळवण्यात आली.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील ४८ तासांत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईत गुलाबी थंडी पडण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याची काही शहरं गारठण्याची शक्यता आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा प्रभाव वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

IMD Weather update
Daily Horoscope Today: चंद्राचे मिथुन राशीत भ्रमण, या राशींच्या लोकांना येणार सोन्यासारखे दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com