Weather Alert : देशातील 22 राज्यांना आज पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

IMD Rain Alert Today : भारतीय हवामान खात्याने बुधवारी देशातील तब्बल 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
IMD Rain Alert in Maharashtra
IMD Rain Alert in MaharashtraSaam TV
Published On

सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून शेकडो लोक बेघर झाले आहेत. गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये पावसाने अक्षरश:कहर केलाय. दोन्ही राज्यांतील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. अशातच पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केलाय.

IMD Rain Alert in Maharashtra
Jayakwadi Water Level : जायकवाडी धरण 4 दिवसातच निम्मं भरलं, मराठवाड्याला मोठा दिलासा; पाहा धरणातील आजचा पाणीसाठा

हवामान खात्याने बुधवारी तब्बल 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain) दिला आहे. जम्मू-काश्मीरसह उत्तर-पश्चिम आणि मध्य आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढणार असून या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. गुजरात आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशाचा काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळचा बहुतांश भागात आज बुधवारी तुफान पाऊस कोसळणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

आज पुणे तसेच रायगड आणि सातारा या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट (IMD Rain Alert) जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिकसह, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आज दमदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणीत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहे.

विदर्भातील, नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस देशासह महाराष्ट्रात पावसाची अशीच स्थिती राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

IMD Rain Alert in Maharashtra
Weather Alert : आनंदाची बातमी! अल निनोचा प्रभाव संपला, 'या' दोन महिन्यांत मुसळधार पाऊस कोसळणार, वाचा US IMD अंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com