Water Issue in India : चिंता वाढली; देशातील १५० जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट, दक्षिणेतील धरणे अर्धे रिकामे

Water Issue in India : देशातील वातावरणात मोठा बदल झाल्याने नागरिकांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. भारतातील १५० जलाशयांची पाण्याची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के इतकी घसरली आहे.
water issue
water issue Saam tv

नवी दिल्ली : देशातील वातावरणात मोठा बदल झाल्याने नागरिकांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. भारतातील १५० जलाशयांची पाण्याची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के इतकी घसरली आहे. सलग ३० व्या आठवड्यातही पाणी पातळीत घट झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, देशातील धरणांची पाणी पातळी मागील १० वर्षांच्या सरासरीपेक्षा ३० टक्के कमी असल्याचे समोर आलं आहे. तर जलाशय क्षमतेच्या २८ टक्के पर्यंत भरली आहेत.

water issue
Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

भारतातील बहुतेक जलाशयांमधील पाणी पातळी घसरलीआहे. दक्षिण भारतामधील ४२ जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली आहे. तेथील ४२ जलशयांमध्ये फक्त १६ टक्के पाणीसाठा आहे. तर पाच जलाशय कोरडले पडले आहेत. दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्य येतात. दक्षिणेतील या राज्यात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे.

भारताच्या पूर्व राज्यातील २३ जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ ३ टक्के पाणीसाठा अधिक आहे. जलाशयांमधील पाणी पातळी कमी होऊ लागल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे. तसेच विद्युत निर्मितीलाही याचा फटका बसत आहे.

water issue
Hingoli Water Crisis: हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीबाणी; 500 गावांत शासनाच्या योजना निष्क्रिय, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

देशातील काही भागात उष्णतेच्या लाटांचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, देशातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या भागात साधारणत: 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com