संदीप नागरे साम टिव्ही, हिंगोली
राज्यात दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने दुष्काळाची लाट पसरली आहे. अनेक जिल्ह्यात जनावरं आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला (Hingoli Water Crisis) आहे. घरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मराठवाड्यात पाणीबाणी सारखी स्थिती निर्माण होत चालली आहे. गावखेड्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट होत आहे. तर दुसरीकडे निवडणुकीमुळे राजकीय पक्ष आणि नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.
प्रशासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्हे पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. गावखेड्यातील पाण्याचे स्त्रोत असलेले बोरवेल, हातपंप आणि विहिरी कोरड्याठाक पडल्या (Water Shortage News) आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यांना शेतशिवारातील विहिरी, ओढे आणि तलावातील पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे.
दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक गावातील नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावं, यासाठी जलजीवन मिशन योजनेची कामे हाती घेण्यात आली होती. हिंगोली जिल्ह्यात 18 महिन्यांपूर्वी या कामांना सुरुवात देखील करण्यात आली (Hingoli Water Shortage News) होती. मात्र, कंत्राटदार आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणामूळे ही कामे खोळंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे.
एकट्या हिंगोली जिल्ह्यात 616 पैकी तब्बल पाचशे गावात जलजीवन मिशन योजनेची सुरू करण्यात आलेली कामे रखडली आहेत. या कामांना प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 2025 मध्ये ही कामे पूर्ण होणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचे आणखी चटके सोसावे लागणार आहेत. पिण्याचं पाणी मिळावं, यासाठी शेकडो नागरिक जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दररोज आंदोलन करत (Hingoli News) आहेत. मात्र, प्रशासन या नागरिकांची दखल घेत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न कुणापुढे मांडावा? असा प्रश्न देखील जिल्ह्यातील गावकऱ्यांना पडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.