

Raging angry bull And Young Man Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) असंख्य अपघाताचे हल्ल्याचे व्हिडिओ (Video) समोर येत असतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो, तर कधी अंगावर काटाही उभा राहतो. सध्या अशाच एका व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील (Viral Video) तरुणासोबत जे घडलं ते पाहून तुम्हालाही त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. काय आहे या व्हायरल व्हिडिओची इनसाईड स्टोरी, चला जाणून घेवू...
अनेकदा चौकात किंवा रस्त्यावर फिरताना आपल्याला भटकी जनावरे, कुत्री यांच्याशी सामना करावा लागतो. बऱ्याचदा खवळलेल्या बैलाने अनेकांची पंचाईत केल्याचेही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. अशावेळी अनेकांची पळता भूई थोडी होते. सध्या असाच एका खवळलेल्या बैलाचा आणि तरुणाचा व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमधील या तरुणासोबत जे काही घडलं ते पाहून बिचाऱ्याचं नशीबचं वाईट, अशीच प्रत्येक भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गावाची दृश्ये दिसत आहेत. ज्यामध्ये एक खवळलेला बैल (Angry Bull) सैरावैरा पळत दिसेल त्याच्या अंगावर धावत आहे. या बैलाचा रुद्रावतार आणि त्याची भलीमोठी शिंगे पाहून नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. ज्यामुळे त्याच्यापासून वाचण्यासाठी लोक वाट दिसेल त्या दिशेने पळत आहेत.
यावेळी बैलापासून जीव वाचवण्यासाठी एक तरुण घाईघाईने सरसर विजेच्या खांबावर चढतो. तरुण विजेच्या खांबावर चढताच बैल त्याच खांबाखाली उभा राहतो. आता हा तरुण बैल लांब जावून खाली उतरावे अशा विचारात असतो. मात्र ज्या खांबावर तो जीव वाचवण्यासाठी चढला, त्याच खांबाला हा बैल बांधल्याचे बिचाऱ्याच्या लक्षातचं येत नाही. ज्यामुळे त्याची चांगलीच पंचाईत होते.
हा व्हिडीओ कुठला आहे. त्याबद्दल काही विशेष माहिती नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत एका यूजरने 'एखाद्या व्यक्तीला खांबाला बांधले असते तेव्हा किती मजा आली असती, असे म्हणले आहे. तर आणखी एकाने बिचाऱ्याचं नशीबंच वाईट अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.