Viral News: आश्चर्यकारक! हृदयाचं ऑपरेशन सुरु असताना महिलेने दिला बाळाला जन्म, दोघे सुखरुप

Viral News: लखनऊमध्ये डॉक्टरांनी महिलेची एकाच वेळी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया आणि सिझेरियन प्रसूती केली आहे.
woman gave birth to a baby While heart operation
woman gave birth to a baby While heart operation saam tv
Published On

Viral News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) येथील डॉक्टरांनी एका महिला रुग्णावर एकाच वेळी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया आणि सिझेरियन प्रसूती केली आहे.

केजीएमयूचे प्रवक्ते डॉ. सुधीर सिंह यांनी सांगितले की आमच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच गर्भवती महिलेसाठी एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर आई आणि नवजात बाळ दोघेही सुखरुप आहेत.

woman gave birth to a baby While heart operation
Rahul Dravid:'नशीब असावं तर KL Rahul सारखं..' फ्लॉप होऊनही द्रविडने संघाबाहेर करण्यास दिला नकार

हृदयविकाराचा गंभीर आजार असलेली 27 वर्षीय महिला रुग्ण पूर्ण मुदतीच्या गर्भावस्थेत प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात आली होती. डॉ. सिंह यांनी सांगितले की, ती महिला गर्भधारणेसह गंभीर स्थितीत असल्याने उत्तराखंडमधील अनेक रुग्णालयांनी तिला KGMU मध्ये पाठवले होते. (Latest Marathi News)

अशा रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण सक्रीय प्रसूतीदरम्यान किंवा ऍनेस्थेसियानंतर बेशुद्ध होतात. कारण त्यांचे हृदय क्लिष्ट शस्त्रक्रिया प्रक्रिया सहन करू शकत नाही. त्यामुळे या महिलेला अनेक रुग्णालयांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आणि तिला हाय सेंटरमध्ये पाठवले. सीव्हीटीएसचे प्रोफेसर एसके सिंग म्हणाले की, या महिलेची प्रसूती करणे हे मोठे आव्हान होते. (Viral News)

woman gave birth to a baby While heart operation
Arjun Khotkar : शिवसेनेच्या निष्ठावान नेत्याची थेट उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले...

डॉक्टरांनी सांगितले की, सी-सेक्शन आणि हृदय शस्त्रक्रियेदरम्यान मुलाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रसूतीतज्ञ, कार्डियाक ऍनेस्थेटिस्ट आणि कार्डियाक सर्जन असे वेगवेगळे तज्ञ असलेल्या टीमने विचारमंथन केल्यानंतर एकाच सिटिंगमध्ये सिझेरियन सेक्शन आणि हृदय शस्त्रक्रिया करून महिला आणि तिच्या बाळाला वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com