Arjun Khotkar : शिवसेनेच्या निष्ठावान नेत्याची थेट उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले...

Arjun Khotkar : शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलंय.
Arjun Khotkar
Arjun KhotkarSaam tv

Arjun Khotkar : शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानतंर शिंदे गटातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली आहे. मात्र आज शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलंय.

अर्जून खोतकर यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याबाबात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. (Latest Marathi News)

Arjun Khotkar
Maharashtra politics : शिवसेना शाखा ताब्यात घेणार का? शिंदे गटातील बड्या नेत्याचं मोठं भाष्य,म्हणाले...

अर्जुन खोतकर म्हणाले, 'काल जो धनुष्यबाण आणि पक्षाचा निर्णय झाला, तो लाखो करोडो शिवसैनिकांच्या मनातील निर्णय झाला. शिवसेना ज्यांच्या दावणीला यांनी बांधली होती ते दोरखंड एकनाथ शिंदे यांनी तोडले आहेत' असे म्हणत खोतकर यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. (Latest Political News)

Arjun Khotkar
ICC WTC Point Table:भारताचं दुसऱ्यांदा WTC फायनलचं तिकीट जवळजवळ कन्फर्म! पाहा पॉइंट्स टेबल

राऊतांच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करतो - खोतकर

संजय राऊत यांनी केलेल्या 2000 कोटीच्या आरोपावर बोलताना खोतकर म्हणाले, संजय राऊत काय बोलतात हे महाराष्ट्राला माहीत आहे. संजय राऊत यांच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करतो अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com