Vande Bharat Express : या शहराला मिळणार ३ वंदे भारत, कुठून कुठपर्यंत धावणार?

Vande Bharat Express new trains : आग्रा विभागातून लवकरच तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहेत, त्यापैकी दोन स्लीपर ट्रेन असणार आहेत. लखनौ व निजामुद्दीन स्थानकांवरून या गाड्या धावणार आहेत. कवच प्रणालीसह प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक होणार आहे.
वंदे भारत
वंदे भारत Saam Tv
Published On

Vande Bharat Express : उत्तर प्रदेशला लवकरच तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागाला दोन महिन्यात आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. त्यासाठी चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तीनमधील दोन एकस्प्रेस या स्लीपर ट्रेन असतील. लखनौ स्टेशनवरून (Lucknow Railway station) दोन वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. तर हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून (Hazrat Nizamuddin station) एक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेस कवच सिस्टिम (Kavach system) अंतर्गत धावणार आहे. लवकरच या स्थानकावरून टेस्टिंग सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे वेळ वाचणार आहेच, त्याशिवाय आरामदायी प्रवास करतायेईल.

आग्रा विभागातून सध्या चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. यामध्ये आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. आग्रा विभागातून धावणाऱ्या चार वंदे भारतला सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या धावणाऱ्या ४ ही वंदे भारत एक्सप्रेसच्या जागा ८० टक्के भरलेल्या आहेत. आग्रा-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसला म्हणावा तितका प्रतिसाद नाही, लवकरच या मार्गावरही मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, असे सांगण्यात येतेय. रेल्वेकडून आता वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढवण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे वेळ तर वाचणार आहेच, त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे.

वंदे भारत
Vande Bharat : मुंबईला आणखी एक वंदे भारत मिळणार, पण... रेल्वेचा मास्टरप्लान काय?

कोण कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एकेस्प्रेस

लखनौ ते इंदोर (Lucknow to Indore) या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही वंदे भारत स्लीपर आग्रा मार्गे धावेल. ८४७ किमीचा प्रवास वंदे भारत स्लीपर फक्त १४ तासात पार करेल. सध्या या मार्गावर प्रवास करण्यासाठी रेल्वेला १७ तासांचा वेळ लागतो. लखनौवरून जयपूर या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ५६७ किमी प्रवासासाठी सध्या १२ ते १३ तासांचा वेळ लागतो. वंदे भारत हे अंतर १० तासांत पूर्ण करेल.

वंदे भारत
Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

निजामुद्दीन ते इंदोर या मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस धावणार आहे. दोन शहरांमधील ८२४ किमीचे अंतर कापण्यासाठी सध्या ट्रेनला १७ तास लागतात. वंदे भारत स्लीपर ट्रेन १४ तासांत हे अंतर पार करणार आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून आग्रा विभागातून ३ वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ललवकरच वंदे भारत एक्सप्रेसची चाचपणी करण्यात येणार आहे. या तीन वंदे भारत एक्सप्रेसला १२ ते १४ डब्बे असतील. प्रवाशांच्या संख्येवर बोगीची संख्या कमी जास्त केली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आलेय.

वंदे भारत
Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com