Valentine Day : 'व्हेलेंटाईन डे'ला जोडप्याने केला अनोखा करार; नियम मोडणारा करणार टॉयलेट साफ

west bengal couple agreement : 'व्हेलेंटाईन डे'ला पश्चिम बंगालमधील जोडप्याने एक अनोखा करार केला आहे. या करारात नियम मोडणारा व्यक्ती टॉयलेट साफ करणार आहे.
Valentine Day 2025
Valentine Day Saam tv
Published On

जगभरात 'व्हेलेंटाईन डे'ची धामधूम सुरु आहे. अनेक जण त्यांच्या प्रिय व्यक्तीला फुल, चॉकलेट आणि इतर वस्तू देऊन प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. या 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी सोशल मीडियावर एका अनोख्या कराराची जोरदार चर्चा होत आहे. एका पती-पत्नीने 'व्हेलेंटाईन डे'ला एक करार केला आहे. दोघांनी संसार सुखाने व्हावा, यासाठी करार केला आहे.

पती-पत्नीने ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपरवर एक करार केला आहे. दोघांनी स्टॅम्प पेपरमध्ये नियम आखले आहेत. पश्चिम बंगालच्या जोडप्याने हा करार केला आहे. पश्चिम बंगालमधील अनाया आणि शुभम यांच्या लग्नाला दोन वर्ष झाले आहेत. त्यांनी दोघांमध्ये वाद होऊ नयेत, यासाठी दोघांनी करार केला आहे.

Valentine Day 2025
Valentine's Day: 'व्हॅलेंटाईन डे'ला लाल गुलाबच का देतात? सफेद किंवा गुलाबी का नाही

'व्हेलेंटाईन डे'ला शुभम आणि अनाया यांनी घरात एकोप्याने राहण्यासाठी नियम आखले. लग्नानंतर वाढणारे वाद थांबावेत आणि संसारात सुखाने व्हावा, यासाठी करार केला. दोघांमध्ये वाद कमी होऊन प्रेम कायम टिकावं, यासाठी त्यांनी निर्णय घेतला आहे. व्हेलेंटाईन डेला करार करून दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यात शुभमच्या क्रिप्टोकरन्सीच्या सवयीचा देखील समावेश आहे. शुभमला रात्री जेवताना ट्रेडिंग मार्केट्सविषयी चर्चा न करण्यास सूचित केले आहे. शुभमला बेडरुममध्येही काही नियमांना बांधील राहावं लागणार आहे.

Valentine Day 2025
Valentines Day: पत्नी अंजली नाहीये सचिनचं पहिलं प्रेम; 'व्हॅलेंटाईन डे'च्याच दिवशी दिली होती जुन्या प्रेमाची कबुली

शुभमला अनायास 'माय ब्यूटीकॉइन' आणि 'माय क्रिप्टोपाई' नावाने हाक मारण्यास बंदी असणार आहे. या व्यतिरिक्त त्याच्यावर रात्री ९ वाजता ट्रेडिंग अॅप्स वापरण्यास बंदी घातली आहे. युट्युबवर कॉइन रिसर्च व्हिडिओ पाहण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

अनायासाठी देखील काही नियम आखण्यात आले आहेत. तिला शुभमच्या कुटुंबीयांची तक्रार करता येणार नाही. तिला चर्चेदरम्यान शूभमच्या एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख करता येणार नाही. महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स आणि रात्री उशिरा जेवण ऑर्डर करण्यावरही बंधने घातली आहेत. v

Valentine Day 2025
Valentine's Day: 'व्हॅलेंटाईन डे'ला लाल गुलाबच का देतात? सफेद किंवा गुलाबी का नाही

करारानुसार, पती आणि पत्नीपैकी एकाने कराराचं उल्लंघन केलं, तर दंड भरावा लागणार आहे. नियम मोडणाऱ्या व्यक्तीला ३ महिने घरातील कामे, कपडे धुणे, टॉयलेट साफ करणे, महिन्याचं रेशन खरेदी करण्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे. दोघांचा हा करार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या करारावर लोक वेगवेगळे प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com