Vaishno Devi Landslide: वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू; जम्मू-कटरा हायवे बंद, २२ ट्रेन रद्द

Vaishno Devi Mandir: वैष्णो देवी मार्गावर मंगळवारी भूस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. या घटनेनंतर वैष्णो देवी यात्रा थांबवण्यात आली.
Vaishno Devi Landslide: वैष्णो देवी मार्गावर  भूस्खलन, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू; जम्मू-कटरा हायवे बंद, २२ ट्रेन रद्द
Vaishno Devi LandslideSaam Tv
Published On

Summary -

  • वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन, ३३ जणांचा मृत्यू.

  • जम्मू-कटरा महामार्ग वाहतुकीसाठी बंद.

  • नॉर्दर्न रेल्वेने २२ ट्रेन रद्द, २७ शॉर्ट-टर्मिनेट.

  • एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कराकडून मदतकार्य सुरू.

जम्मू-काश्मिरमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. कटरा येथील अर्धकुमारीजवळ वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर भूस्खलन झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला. तर २३ जण जखमी झाले आहेत. या भूस्खलनाच्या घटनेनंतर वैष्णो देवी यात्रा थांबवण्यात आली. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची ही घटना घडली. अजूनही पाऊस पडत असल्यामुळे मतदकार्यामध्ये अडथळे येत आहेत.

भूस्खलनानंतर मलबा आणि मोठमोठे दगड पडल्यामुळे जम्मू-कटरा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे नॉर्दर्न रेल्वेने बुधवारी २२ ट्रेन रद्द केल्या तर २७ ट्रेन शॉर्ट- टर्मिनेट केल्या. यामध्ये वैष्णो देवी बेस कॅम्पमधून जाणाऱ्या ९ ट्रेनदेखील आहेत. भूस्खलनानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vaishno Devi Landslide: वैष्णो देवी मार्गावर  भूस्खलन, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू; जम्मू-कटरा हायवे बंद, २२ ट्रेन रद्द
Jammu Drone Attack : पाकड्यांचा भारतावर हल्ला; गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे ८ जवान जखमी, घटनास्थळी स्थिती काय?

जम्मू-काश्मिरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. जम्मूमध्ये पूल कोसळला, विद्युत पोल आणि मोबाईल टॉवरचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जम्मूमध्ये ६ तासांत २२ सेंटीमीटर पाऊस पडला. आजही जम्मू-काश्मिरमधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Vaishno Devi Landslide: वैष्णो देवी मार्गावर  भूस्खलन, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू; जम्मू-कटरा हायवे बंद, २२ ट्रेन रद्द
Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मिरमधील अनेक ठिकणी पूर आला आहे. मंगळवारपर्यंत ३,५०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन, जम्मू-काश्मीर पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या संयुक्त पथकांकडून मदतकार्य सुरू आहे. बाधित लोकांना तात्पुरत्या निवार्यांमध्ये अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.

Vaishno Devi Landslide: वैष्णो देवी मार्गावर  भूस्खलन, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू; जम्मू-कटरा हायवे बंद, २२ ट्रेन रद्द
Jammu and kashmir : वैष्णो देवी मंदिर यात्रेत मोठी दुर्घटना; ५ भाविकांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com