

आर्टिफियल इंटेलिजंस आणि मानवतेच्या भविष्यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे वैभव जैन यांनी जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलं आहे. Future of Life Institute या अमेरिकन संस्थेने आयोजित केलेल्या Keep The Future Human या आंतरराष्ट्रीय क्रिएटीव्ह रायटींगच्या स्पर्धेत वैभव जैन यांनी 10,000 अमेरिकन डॉलर्सचं ग्रँड प्राईज जिंकलं आहे. या स्पर्धेत ते एकमेव भारतीय विजेते ठरले आहेत.
Keep The Future Human ही एक आंतरराष्ट्रीय creative writing आणि art स्पर्धा होती. जगभरातील लेखक, कलाकार आणि विचारवंतांना AI आणि मानवतेच्या भविष्यावर कथा, कविता, कला, व्हिडिओ तयार करण्यास सांगण्यात आलं होतं. जर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) इतक्या वेगाने विकसित होत असेल की तिला नियंत्रित करणं कठीण झालं तर आपण काय करावं? आणि हा विकास अपरिहार्य आहे का, की अजूनही आपल्या हातात निवडीचा पर्याय आहे?, हा या स्पर्धेचा केंद्रबिंदू होता.
या स्पर्धेतील Writing category मध्ये फक्त एकच Grand Prize देण्यात येणार होतं आणि ते वैभव जैन यांना मिळालं. संपूर्ण विजेत्यांच्या यादीत ते एकमेव भारतीय ठरलेत. विशेष म्हणजे ही त्यांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी The Button ही कथा लिहीली. वैभव जैन हे पेशाने चार्टड अकाऊंटट आहेत.
वैभव जैन यांची विजेती कथा The Button ही एका काल्पनिक AI संशोधक Elena Chen हिच्याभोवती फिरते. ती Prometheus AI नावाच्या कंपनीत काम करत असते. दररोज ऑफिसला जाताना ती एका काल्पनिक बटणाचा विचार करते. हे एक असं बटण असतं जे AGI म्हणजेच Artificial General Intelligence 5 ते 10 वर्षे पुढे ढकलू शकेल.
या कथेत एक महत्त्वाचा विरोधाभास समोर येतो. जे संशोधक AI तयार करतायत त्यांनाच मनातून असं वाटतंय की, हे थांबायला हवं. मात्र “आपण नाही केलं, तर दुसरा देश करेल” या भीतीपोटी ही शर्यत थांबत नाहीये. हाच collective action trap या कथेत मांडण्यात आलाय.
या कथेत शेवटी दिलेल्या वाक्याचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. “The button doesn’t exist. So we have to be the button.” म्हणजेच AI थांबवण्यासाठी कोणतंही जादूचं बटण नाही, पण जबाबदारीने निर्णय घेणारे आपणच ते बटण बनायला हवं.
ही कथा तांत्रिक चर्चेला मानवी भावना आणि नैतिकतेची जोड देते, म्हणूनच ती परीक्षकांना भावली.
आज भारतात कोट्यवधी लोक AI चा वापर करत आहेत. अगदी शाळा, ऑफिस, व्यवसाय, प्रशासन अशा सर्व क्षेत्रांमध्ये याचा वापर केला जातो. मात्र AI safety बद्दलची चर्चा अजूनही Silicon Valley किंवा काही धोरणात्मक वर्तुळांपुरती मर्यादित आहे.
हा विजय भारतासाठी महत्त्वाचा असून, ही कथा दाखवते की, भारतीय या जागतिक चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. AI चं भविष्य फक्त अमेरिका किंवा चीन ठरवणार नाही तर भारतालाही यात सहभाग घ्यावा लागेल.
२०१४ साली स्थापन करण्यात आलेली फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्युट ही अमेरिकेतील एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक MIT चे प्राध्यापक Max Tegmark आणि Skype चे co-founder Jaan Tallinn आहेत. ही संस्था अशा तंत्रज्ञानावर संशोधन आणि जनजागृती करते, मानवतेच्या भविष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या तंत्राज्ञानावर या संस्थेकडून संशोधन केलं जातं.
2023 मध्ये या संस्थेने AI development काही काळासाठी थांबवण्याची मागणी करणारे open letter प्रसिद्ध केलं होतं. या पत्रावर Elon Musk, Apple चे सहसंस्थापक Steve Wozniak यांच्यासह हजारो AI संशोधकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, ज्यामुळे ही संस्था जगभर चर्चेत आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.