Haryana Government: भाजपचं सरकार संकटात; काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव

Haryana Political Turmoil : हरियाणा सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलाय. शुक्रवारी विधानसभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
 Haryana Political Turmoil :
Haryana Assembly session amid political tension after Congress moves no-confidence motion.saam tv
Published On
Summary
  • हरियाणा विधानसभेत काँग्रेसने भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

  • विधानसभा अध्यक्षांनी प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे.

  • शुक्रवारी विधानसभेत प्रस्तावावर सविस्तर चर्चा होणार आहे

मागील वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. एक वर्ष होत नाही तोच सरकार संकटात आलंय. काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यामुळे वर्ष उलटत नाही तोच राज्यातील नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आलंय.

 Haryana Political Turmoil :
New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

काँग्रेसने राज्यातील विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतलेत. याआधी काँग्रेसने अनेकदा राज्य सरकारवर तीव्र टीका केली होती. मात्र आता अधिकृतरीत्या विधानसभेत चर्चेसाठी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. शुक्रवारी या अविश्वास प्रस्तावावर विधानसभेत चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यावर मतदान होईल.

 Haryana Political Turmoil :
Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

तसेच या मतदानामधून राज्य सरकारला बहुमत आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४८, काँग्रेसला ३७ आणि आयएनएलडीला २ तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सध्यातरी बहुमत सैनी सरकारच्या बाजूने असल्याचे दिसत आहे

 Haryana Political Turmoil :
मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; मालक रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

आज विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बुधवारी सभापती हरविंदर कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावर आणि अजेंड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या दरम्यान, हरियाणा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १८ ते २२ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या काळात एकूण तीन बैठका झाल्या. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "विरोधक सभागृहाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत आहेत." पावसाळी अधिवेशनानंतर दुसरे अधिवेशन सहा महिन्यांनी अनिवार्य आहे. २६ फेब्रुवारी रोजी सहा महिने पूर्ण होतील, तरीही सरकारने हिवाळी अधिवेशन बोलावल्याची माहिती त्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com