World War 3: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन

Elon Musk Warn World War 3: तीन वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरुय.मात्र हे युद्ध सुरु असतानाच आता जगात तिसरं महायुद्ध भडकण्याचा इशारा एलॉन मस्कने दिलाय. मात्र मस्कने हा इशारा देतांना काय म्हटलंय. आणि तिसऱ्या महायुद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि नाटोच्या महासचिवांनी काय म्हटलंय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Elon Musk  Warn World War 3:
Elon Musk as global tensions rise amid the Russia–Ukraine war and fears of a third world war.saam tv
Published On
Summary
  • रशिया–युक्रेन युद्ध तीन वर्षांपासून सुरूच आहे.

  • एलॉन मस्कने तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिल्याने जागतिक चिंता वाढली.

  • डोनाल्ड ट्रम्प आणि नाटोने परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली.

दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे बेचिराख झालेल्या जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहराच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. त्यातच आता उद्योगपती स्पेस एक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत गंभीर इशारा दिलाय. नेमकं काय म्हणालेत मस्क? पाहूयात.

येत्या 5-10 वर्षात मोठं जागतिक युद्ध होणार

या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता

सर्वबाजूंनी अण्वस्त्रांचा वापर होणारं हे पहिलं युद्ध ठरण्याची शक्यता

अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अपयशी ठरण्याची शक्यता

Elon Musk  Warn World War 3:
Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

दुसरीकडे शांततेची आणि युद्ध संपवण्याची भाषा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशिया-युक्रेन युद्ध तिसऱ्या महायुद्धाचं कारण ठरण्याचा इशारा दिलाय. एवढंच नाही तर नाटोच्या अध्यक्षांनीही रशियाच्या इशाऱ्यावर युरोप असल्याची भीती व्यक्त केलीय. त्यामुळे आता युरोपला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. अमेरिकेच्या अटींपुढे मान टाकण्यास युक्रेनने अजूनही होकार दिला नाही. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युद्धाचा भ़डका उडतोच आहे. या युद्धात आतापर्यंत लाखो लोक आणि 25 हजार पेक्षा जास्त सैनिक मारले गेलेत.

Elon Musk  Warn World War 3:
New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

त्यातच आता रशियाने युक्रेनच्या इमारतींवर 450 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाईल डागलेत. आता हा विध्वंस असाच वाढत गेल्यास आणि ऱशिया युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोपची एण्ट्री झाल्यास जग 2 भागात विभागलं जाऊन तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती आहे. अण्वस्त्रांच्या हल्ल्यांनी पृथ्वीवरचं मानवी आयुष्य संकटात सापडलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com