Uttarkashi Tunnel Rescue Update : बोगद्यातून बाहेर पडताच मजुरावर कोसळला दु:खाचा डोंगर, घरी पोहोचण्याआधीच वडिलांचं निधन

Uttarkashi Tunnel Rescue Update :भक्तू मुर्मू असे या मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे. भक्तू बोगद्यातून सुखरूप बाहेर आला तेव्हा त्याला वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली.
Uttar Kashi News
Uttar Kashi News Saam TV
Published On

Uttarkashi Tunnel News :

उत्तराखंडच्या  उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुखरुप सुटका झाली आहे. सर्व मजुरांचे कुटुंबिय मोठ्या आशेने 17 दिवसांपासून वाट पाहत होते. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर सर्व मजुरांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगून जात होता.

मात्र यामधील एक मजूर असा होता की तो बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. बाहेर पडण्याच्या काही वेळ आधी या मजुराच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. भक्तू मुर्मू असे या मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे.

भक्तू जेव्हा सिलक्यारा बोगद्यातून सुखरूप बाहेर आला तेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच भक्तू ढसाढसा रडू लागला. मागील १७ दिवस बोगद्यात अडकला असताना बाहेर पडल्यावर वडिलांना भेटू असं भक्तूला वाटत होतं. हीच भावना वडिलांची होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु होती. त्यामुळे भक्तूची आणि त्याच्या वडिलांची भेट अपूर्णच राहिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttar Kashi News
Uttarakhand Tunnel Accident Update: ''आम्ही फक्त क्रिकेटमध्येच सर्वोत्कृष्ट नाही....'', 'टनल मॅन' अरनॉल्डचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलं अभिनंदन

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, बसेत उर्फ ​​बरसा मुर्मू (वय ७० वर्ष) असं त्यांचं नाव होतं. उत्तरकाशी येथील बोगद्यात आपला मुलगा भक्तू अडकला असल्याची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांना धक्का बसला. मंगळवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर पलंगावर बसले होते. मात्र अचानक ते पलंगावरुन खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. (Latest News)

Uttar Kashi News
EXPLAINER Uttarakhand Tunnel : ४१ मजुरांनी उत्तरकाशी बोगद्यात तब्बल ४०० तासापेक्षा जास्त वेळ कसा घालवला? बचावकार्यात काय आल्या अडचणी?

मुलगा बोगद्यात अडकल्याची माहिती मिळाली तेव्हापासून ते काळजीत होते. भक्तूचा मित्र सोंगा बांद्रा हाही त्याच्यासोबत बोगद्यात काम करण्यासाठी गेला होता. मात्र अपघात झाला तेव्हा तो बोगद्याच्या बाहेर होता. अपघातानंतर लगेचच सोंगा यांनी भक्तूच्या घरी फोन करून तो बोगद्यात अडकल्याची माहिती दिली. यानंतर त्याच्या वडिलांना अस्वस्थ आणि काळजी वाटू लागली. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com