Uttarakhand Tunnel Accident Update: ''आम्ही फक्त क्रिकेटमध्येच सर्वोत्कृष्ट नाही....'', 'टनल मॅन' अरनॉल्डचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केलं अभिनंदन

Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना १६ दिवसानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय भूविज्ञान असोसिएशनचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स या रेस्क्यू ऑपरेशनचा भाग होते.
Uttarakhand Tunnel Accident Update
Uttarakhand Tunnel Accident UpdateSaam Digital
Published On

Uttarakhand Tunnel Accident Update

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना १६ दिवसानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय भूविज्ञान असोसिएशनचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स या रेस्क्यू ऑपरेशनचा भाग होते. मोहीम पार पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांच अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधानांच्या अभिनंदनाला प्रतिसाद देताना अरनॉल्ड डिक्स म्हणाले, धन्यवाद पंतप्रधानजी, आम्ही फक्त क्रिकेटमध्येच सर्वोत्कृष्ट नाही तर इतर गोष्टीही चांगल्या प्रकारे करू शकतो. यामध्ये भारतातील उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या रेस्क्यू ऑपरेशनचाही समावेश आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत असल्यांच म्हटलं आहे.

सतरा दिवस चाललेल्या या बचाव कार्यात ऑस्ट्रेलियाचे संशोधक अरनॉल्ड यांची मोठी भूमिका बजावली आहे. अरनॉल्ड पायाभूत सुविधा आणि भूमिगत बांधकामातील तज्ज्ञ आहेत. भूमिगत जोखमींबाबत मार्गदर्शनही करतात. ते जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय भूविज्ञान असोसिएशनचे प्रमुख आहेत. ही संस्था भूमिगत बांधकामासंबंधी कायदे, पर्यावरण, राजकीय आणि इतर महत्त्वाच्या जोखमींविषयी मार्गदर्शन करते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttarakhand Tunnel Accident Update
Uttarkashi Tunnel Rescue Update : बोगद्यातून बाहेर पडताच मजुरावर कोसळला दु:खाचा डोंगर, घरी पोहोचण्याआधीच वडिलांचं निधन

उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्यात ४१ कामगार अडकल्यानंतर २० नोव्हेंबर पासून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अरनऑल्ड सहभागी झाले होते. ते या मोहिमेत दाखल झाल्यानंतर नाताळपूर्वी कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्याचा दावा केला होता. यावेळी ते म्हणाले होते, हिमालयासारख्या पर्वतांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे नम्रपणा.

डिक्स भूमिगत बांधकाम असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तसेच ते एक अभियंता, वकील आणि भूगर्भशास्त्रज्ञ देखील आहेत. मेलबर्न मधिल मोनाश विद्यापीठातून त्यांनी विज्ञान आणि कायद्याची पदवी घेतली प्राप्त केली. गेल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भूमिगत बाधकाम आणि अनेक घटनांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे भारत सरकारने त्यांना उत्तराखंडमधील दुर्घटनेत रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सरभागी होण्याची विनंती केली होती.

Uttarakhand Tunnel Accident Update
Share Market New Record: शेअर बाजारात पैशांचा पाऊस; BSEचं बाजारमूल्य विक्रमी ४ ट्रिलियनच्या पुढे, भारतीय अर्थव्यवस्थेलाही टाकलं मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com