Helicopter Crash : मोठी बातमी! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता; ५ प्रवासी असल्याची माहिती

Uttarakhand Badrinath Healicopter Crash Update News : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथहून जोशीमठकडे परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ५ प्रवासी असल्याची माहिती.
Uttarakhand Badrinath Helicopter Crash News
Uttarakhand Badrinath Helicopter Crash News AI Image
Published On: 
Summary
  • उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथहून जोशीमठकडे परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता

  • या हेलिकॉप्टरमध्ये ५ प्रवासी असल्याची माहिती

  • चमोली जिल्हा प्रशासनाने तातडीने शोध आणि बचावमोहीम सुरू केली

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बद्रीनाथ धाम येथून परत येत असलेल्या एका हेलिकॉप्टरची अचानक लोकेशन मिळेनाशी झाल्याने खळबळ उडाली आहे. बद्रीनाथ धाम आणि जोशीमठ या दोन ठिकाणांदरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ५ प्रवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान या विमानाचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर हेलिकॉप्टर हे बद्रीनाथ धाम येथून परत येत होतं. या हेलिकॉप्टरमध्ये ५ प्रवाशांसह १ पायलट देखील होता. मात्र हे हेलिकॉप्टर अचानक गायब झालं. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Uttarakhand Badrinath Helicopter Crash News
Diwali Utne : अभ्यंगस्नान करताना उटणे तेलातून लावावे की दुधातून, काय आहे फायदेशीर

चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हेलिकॉप्टरची लोकेशन मिळत नसल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. प्रशासनासह संबंधित हेलिकॉप्टर कंपनीचे पथकही हेलिकॉप्टरचा नेमका ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये किती प्रवासी होते, तसेच हेलिकॉप्टर नेमके कोणत्या ठिकाणी बेपत्ता झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.