Uttarakhand Bus Accident: उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; गंगोत्रीधामवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस दरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Uttarkashi Bus Accident: या भीषण अपघातामध्ये ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर २८ जण जखमी झालेत.
Uttarakhand Bus Accident
Uttarakhand Bus AccidentSaam Tv
Published On: 

Uttarakhand News: उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये भीषण अपघात (Uttarakhand Accident) झाला आहे. गंगोत्रीधामवरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घातला. ३३ भाविकांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. या भीषण अपघातामध्ये ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर २८ जण जखमी झाले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

Uttarakhand Bus Accident
Chhagan Bhujbal: संभाजी भिडे यांच्यावरील वक्तव्यानंतर भुजबळांना धमकी; पोलीस विभागाकडून सुरक्षेत वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गंगोत्री हायवेवर गंग्नानीजवळ झाला आहे. ३३ प्रवाशांना घेऊन बस गंगोत्रीवरुन उत्तरकाशीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीमध्ये कोसळली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ जखमींना रेस्क्यू करण्यात आले आहे. तर ७ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Uttarakhand Bus Accident
Car Crash Test: आता भारतातच होणार क्रॅश टेस्ट, स्वदेशी सेफ्टी रेटिंग BhartNCAP मंगळवारी होणार लॉन्च

घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने पोलीस बचावकार्य करत आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

Uttarakhand Bus Accident
Indian Railways: रेल्वे स्थानकांच्या नावांपुढे जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनल का लिहिले जाते? जाणून घ्या...

गंगोत्री धामला दर्शन घेऊन हे भाविक परत येत होते. त्याचवेळी गंग्नानीजवळ संरक्षण कठडा तोडून बस दरीत कोसळली. भागिरती नदीच्या काठावर असणाऱ्या झाडा झुडपामध्ये ही बस अडकली. त्यामुळे बसमधील अनेक प्रवासी बचावले. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धमी यांनी अपघाताची माहिती मिळाल्याबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com