Accident News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात, कारची डिव्हायडरला जोरात धडक, डॉक्टरसह तिघांचा मृत्यू

Uttar Pradesh Meerut Bulandshahr Accident News : उत्तर प्रदेशातील मेरठ–बुलंदशहर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव क्रेटा कारने डिव्हायडर तोडून ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Accident News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात, कारची डिव्हायडरला जोरात धडक, डॉक्टरसह तिघांचा मृत्यू
Uttar Pradesh Meerut Bulandshahr AccidentSaam Tv
Published On
Summary
  • मेरठ–बुलंदशहर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

  • भरधाव क्रेटा कारने डिव्हायडर तोडून ट्रकला धडक

  • कारमधील तिघांचा जागीच मृत्यू

  • अपघातानंतर वाहन हटवून वाहतूक सुरळीत

  • पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

Uttar Pradesh Meerut Bulandshahr Accident उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील मेरठ-बुलंदशहर राष्ट्रीय महामार्ग ३३४ वर एक भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात सोमवारी रात्री घडला आहे. मेरठचे रहिवासी डॉ. आशुतोष पुनिया, त्यांचे पीएसओ महेश आणि मेरठ रुग्णालयाच्या मालकाचा मुलगा अंकित त्यागी अशी अपघातात मृत झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून तिन्ही मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. या घटनेत नुकसान झालेले वाहन राष्ट्रीय महामार्ग ३३४ वरून हटवण्यात आले आहे आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. डॉ. आशुतोष पुनिया हे त्यांच्या पीएसओसोबत बुलंदशहरहून मेरठला परतत होते. गुलाओठी पोलिस स्टेशन हद्दीतील छप्रावत गावाजवळ हा अपघात झाला.

Accident News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात, कारची डिव्हायडरला जोरात धडक, डॉक्टरसह तिघांचा मृत्यू
Nagpur : नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले, कार इतक्या वेगाने जात होती की तिचे नियंत्रण सुटले, तीन ते चार वेळा उलटली आणि ती डिव्हायडरच्या दुसऱ्या बाजूला गेली. अपघात इतका भीषण होता की, या दुर्घटनेत कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केलं. मात्र प्रवाशांना बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Accident News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात, कारची डिव्हायडरला जोरात धडक, डॉक्टरसह तिघांचा मृत्यू
Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, डॉ. आशुतोष पुनिया आणि अंकित त्यागी हे सरधना पोलिस स्टेशन परिसरातील दालमपूर गावातील रहिवासी होते, तर पीएसओ महेश बुलंदशहर जिल्ह्यातील होते. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com