

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं
स्वत:वर रायफलने गोळी झाडून केली आत्महत्या
निवृत्त अधिकाऱ्याच्या आत्महत्येने उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात खळबळ
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्याच्या छजलैटमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ८८ वर्षीय निवृत्त पोलीस अधीक्षकांनी स्वत:च्या परवानाधारक रायफलने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. निवृत्त पोलीस अधीक्षकांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
पोलीस अधीक्षक कुंवर आकाश सिंह यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने घटनेचा आढावा घेतलाय. आत्महत्या केलेले निवृत्त पोलीस अधिकारी घरात एकटेच राहत होते. पत्नीच्या निधनानंतर काही काळापासून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
निवृत्त पोलीस अधीक्षकांच्या आत्महत्येने रमपुरा गाव आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून निवृत्त पोलीस अधिकारी मानसिक तणावात होते. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतला. पोलिसांनी घरात आढळलेली परवानाधारक रायफल ताब्यात घेतली. पोलिसांनी प्राथमिक पुराव्यांच्या आधारावर तपास सुरुवात केली आहे.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी फार जवळून स्वत:वर गोळी झाडली. फार जवळून गोळी झाडल्याने डोके आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. गोळी झाडल्यानंतर अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी सापडलेली नाही. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणावर ग्रामीण विभागाचे कुंवर आकाश सिंह यांनी म्हटलं की, प्राथमिक तपासानुसार, ते घरात एकटेच राहत होते. त्यांच्या पत्नीचं आधीच निधन झालं आहे. पत्नीच्या निधनानंतर ते नैराश्यात गेले होते. तसेच मानसिक तणावात होते. पोलिसांनी प्राथमिक तपासात निवृत्त पोलीस अधीक्षकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. या प्रकरणात मृतदेहाचा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.