Rain Alert : उत्तर प्रदेशला अवकाळी पावसाचा तडाखा! वीज कोसळल्याने २४ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Rain Alert : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
NORTH INDIA STORM HAVOC: HEAVY RAIN AND LIGHTNING CLAIM LIVES IN UP AND BIHAR
NORTH INDIA STORM HAVOC: HEAVY RAIN AND LIGHTNING CLAIM LIVES IN UP AND BIHARSaam Tv
Published On
Summary
  • उत्तर भारतात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान

  • उत्तर प्रदेशात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

  • बिहारमध्ये वादळामुळे जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान

  • प्रशासनाकडून तातडीचे मदतकार्य आणि सतर्कतेचे आवाहन

उत्तर भारतातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळत असून, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसळधार पावसात आतापर्यंत २४ नागरिकांचा मृत्यू झाला असून १६ जनावरे दगावली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. जोरदार वारे, पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटामुळे २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १५ जण जखमी झाले आहेत. याशिवाय १६ जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि घरांचे नुकसान झाले आहे.

NORTH INDIA STORM HAVOC: HEAVY RAIN AND LIGHTNING CLAIM LIVES IN UP AND BIHAR
Mumbai Goa Highway : कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट! मुंबई गोवा महामार्ग ९० टक्के पूर्ण, फक्त या ठिकाणाचे काम सुरू

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई २४ तासांच्या आत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

NORTH INDIA STORM HAVOC: HEAVY RAIN AND LIGHTNING CLAIM LIVES IN UP AND BIHAR
Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

दरम्यान, बिहारमध्येही बुधवारी संध्याकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठा विध्वंस झाला आहे. यामध्ये किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून, हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रहिवासी होते. पाटणा आणि बेतिया जिल्ह्यांमध्ये मिळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. जहानाबादमध्ये एका घराची बाल्कनी कोसळल्याने चार जण जखमी झाले, तर बक्सरमध्ये ई-रिक्षावर झाड कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहेत.

NORTH INDIA STORM HAVOC: HEAVY RAIN AND LIGHTNING CLAIM LIVES IN UP AND BIHAR
Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

भोजपूर जिल्ह्यातील महुली येथे जोरदार वादळामुळे तरंगता पूल तुटून तीन भागांमध्ये विभागला गेला. सुपौलमध्ये वीज पडल्याने नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. या घटनांमुळे प्रशासन अलर्टवर असून, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्येही अशाच प्रकारच्या हवामानाची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com