Congress: काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ७५ नेत्यांनी सोडली 'पंजा'ची साथ, राजकारणात खळबळ

Congress Former Minister Resignation: काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्यानंतर उत्तर प्रदेशातील ७५ नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडलीय.
Congress Former Minister Resignation
Former Congress leader and ex-minister Naseemuddin Siddiqui after resigning from the party.saam tv
Published On
Summary
  • माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला

  • राजीनाम्यानंतर तब्बल ७५ नेत्यांनी काँग्रेस सोडली

  • पश्चिम उत्तर प्रदेशातील काँग्रेसला मोठा संघटनात्मक धक्का

महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडालाय. त्याचदरम्यान उत्तर प्रदेशातील राजकारणात खळबळ उडालीय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पक्ष पदांचा राजीनामा दिला आहे.

Congress Former Minister Resignation
Rajya Sabha Election: राजकारण तापलं! ५ जागांसाठी महाआघाडीत बिघाडी; NDAमध्येही हालचालींना वेग

सिद्दीकी यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवलाय. सिद्दीकी यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. त्यांच्या राजीनाम्यानंतर ७२ नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडलीय. सिद्दीकी हे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रांतीय अध्यक्ष होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का लागलाय.

Congress Former Minister Resignation
ZP Election: कोकणात पुन्हा बिनविरोध! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीमुद्दीन सिद्दीकी अनेक गोष्टींमुळे नाराज होते. त्यांना पक्षात योग्य आदर दिला जात नाही. काँग्रेस पक्षाने त्यांचा योग्य वापर केला गेला नसल्याने ते नाराज होते अशा बातम्या माध्यामांमध्ये आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांना राज्यसभेत जायचे होते पण पक्षाने त्यांना संधी दिली नाही, त्यामुळे ते नाराज होते. इतकेच नाही तर राहुल गांधींना भेटू न दिल्यानेही ते नाराज होते.

लोकसभा विरोधीपक्षनेते आणि खासदार राहुल गांधी हे जेव्हा रायबरेलीच्या दौऱ्यावर होते त्यावेळी नसीमुद्दीन सिद्दीकी यांना राहुल गांधींना भेटायचे होते. परंतु त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती त्यावरूनही ते नाराज होती. राजीनामा देताना नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या कार्यशैली आणि अंतर्गत परिस्थितीमुळे त्यांना बऱ्याच काळापासून अस्वस्थ वाटत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेत त्यांची सूचना ऐकली जात नव्हती. त्यांच्या सूचनांकडे लक्ष दिले जात नव्हतं. दरम्यान त्यांनी कोणत्याही नेत्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केलेले नाही. दरम्यान निवडणुकीच्या आधी अशा प्रमुख नेत्यांनी पक्षात बाहेर पडण्यामुळे काँग्रेसची तळागाळातील पकड कमकुवत होण्याची शक्यता आहे. आपल्या राजीनामा पत्रात सिद्धीकी म्हणाले, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेविरुद्ध जोरदार लढा देण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये सामील झालो होतो. परंतु काँग्रेस पक्षात राहून ही लढाई लढणे अशक्य असल्याचं अनुभवास आले. दरम्यान राजीनामा पत्रात त्यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याविरुद्ध वैयक्तिक तक्रार केली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com