माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Yogi Government’s Big Security Move: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, योगी सरकारने मायावती आणि अखिलेश यादव यांच्यासह ४४ नेत्यांना बुलेटप्रूफ जॅकेट्स पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अकरा मंत्र्यांनाही हे संरक्षक कवच दिले जाणार आहे.
Mayawati Akhilesh Yadav bulletproof jacket security
Mayawati Akhilesh Yadav bulletproof jacket securitysaam tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशातील ४४ प्रमुख नेत्यांना बुलेटप्रूफ जॅकेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • मायावती आणि अखिलेश यादव यांचाही या सुरक्षा व्यवस्थेत समावेश आहे.

  • ११ मंत्र्यांनाही बुलेटप्रूफ जॅकेटचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, योगी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. एरव्ही सुरक्षा कर्मचाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट दिले जातात. मात्र उत्तर प्रदेश सरकारने आता थेट नेत्यांचा बुलेटप्रूफ जॅकेट देण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं असा निर्णय का घेतला हे जाणून घेऊ.

Mayawati Akhilesh Yadav bulletproof jacket security
भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं घेतलाय. सुरक्षेचा आढावा आणि गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सरकारने राज्यातील ४४ प्रमुख नेत्यांना हे जॅकेट दिलं जाणार आहे. यात माजी मुख्यमंत्री मायावती आणि अखिलेश यादव यांचाही समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा मुख्यालयाकडून सुमारे १० लाख रुपये किमतीच्या विशेष बुलेटप्रूफ जॅकेट्सची खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. 'Y' आणि 'Z+' सुरक्षा कवच असलेल्या नेत्यांमध्ये विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचा तसेच मंत्र्यांचा समावेश आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, संभाव्य धोक्यांमुळे नेते आणि मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Mayawati Akhilesh Yadav bulletproof jacket security
CJP Attack : सरकारी शाळेची पोलखोल करायला गेलेल्या CJP टीमवर जीवघेणा हल्ला, Video व्हायरल

सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन योगी सरकारमधील ११ मंत्र्यांना हे जॅकेट्स देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये संजय निषाद आणि नंद गोपाल गुप्ता 'नंदी' यांसारख्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री मायावती आणि अखिलेश यादव यांसारख्या विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांव्यतिरिक्त, संगीत सोम आणि सुरेश राणा यांसारख्या नेत्यांचाही या सुरक्षा कवचामध्ये समावेश करण्यात आला आहे. 'वाय' (Y) ते 'झेड-प्लस' (Z-plus) श्रेणीतील सुरक्षा कवच असलेल्या निवडक आमदारांना आणि नेत्यांना ही विशेष बुलेटप्रूफ जॅकेट्स पुरवली जात आहेत.

रॅली आणि रोडशोजच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी राजकीय नेत्यांकडून जाहीर सभा व रॅलींचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. अशा कार्यक्रमांच्या वेळी सहसा मोठ्या संख्येने जनसमुदाय जमतो. राज्य पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, कोणत्याही अनुचित घटनेची किंवा हल्ल्याची शक्यता टाळण्यासाठी योगी सरकारने ही खबरदारीची उपाययोजना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com