Uttar Pradesh News: विद्येच्या मंदिरात द्वेषाचे धडे! शिक्षिकेच्या सांगण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण; नेटकऱ्यांचा संताप

Child Beaten in Muzaffarnagar School: पाचचा पाढा पाठ न केल्याने ही शिक्षा देण्यात आली असून व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला शिक्षिकेवर कारवाईची मागणी होत आहे.
Child Beaten in Muzaffarnagar School
Child Beaten in Muzaffarnagar SchoolSaamtv
Published On: 

UP Viral Video: जिथे विद्यार्थ्यांना प्रेमाचे, समभावाचे धडे दिले जातात त्याच विद्येच्या मंदिरात द्वेषाची वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार उत्तरप्रदेशमध्ये समोर आला आहे. शाळेतील महिला शिक्षक एका मुलाला वर्गातील इतर वर्गमित्रांकडून चापट मारायला लावत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Child Beaten in Muzaffarnagar School
Mumbai Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर ५६ तासांचा जम्बो ब्लॉक; ४८ ट्रेन रद्द

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) खुब्बापूर गावातील शाळेमधील एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला शिक्षिका मुस्लिम विद्यार्थ्याला भर वर्गात उभं करुन शिक्षा करताना दिसत आहे. पाचचा पाढा पाठ न केल्याने ही शिक्षा देण्यात आली असून वर्गातील इतर विद्यार्थ्यांना समोर येवून त्या मुलाला मारायला सांगत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे महिला शिक्षिका वर्गामध्ये विशिष्ठ समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचेही दिसत आहे. मुलगा रडत असतानाही त्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण होताना दिसत आहे. तसेच जोरात मारा.. असेही संबंधित महिला शिक्षिका इतर मुलांना सांगत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला शिक्षिकेवर कारवाईची मागणी होत आहे.

Child Beaten in Muzaffarnagar School
Nagpur News: धक्कादायक वास्तव! आठवी-नववीचे ३,४८७ विद्यार्थी मुख कॅन्सरच्या उंबरठ्यावर; ५२% मुलांना तंबाखूचे व्यसन

व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) निशाणा साधला आहे. निरागस मुलांच्या मनात भेदभावाचे विष पेरणे, शाळेसारख्या पवित्र जागेला द्वेषाचा बाजार बनवणे, हेच रॉकेल भाजपने पसरवले आहे, यापेक्षा वाईट काहीच नाही.. अशी संतप्त प्रतिक्रया त्यांनी दिली आहे. मुले देशाचे भविष्य आहेत, त्यांचा द्वेष करु नका.. असेही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.