Mumbai Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर ५६ तासांचा जम्बो ब्लॉक; ४८ ट्रेन रद्द

Mumbai Railway mega block : पश्चिम रेल्वे मार्गावर ५६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला असून, अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
Western Railway Mega Block
Western Railway Mega BlockSAAM TV
Published On

Mumbai Railway mega block : पश्चिम रेल्वे मार्गावर आज, २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. एकूण ५६ तासांचा हा ब्लॉक आहे. सूरत यार्डात इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला आहे.

या ब्लॉकच्या कालावधीत सूरत आणि उधनादरम्यान तिसरी मार्गिका जोडण्याचे काम करण्यात येईल. या ब्लॉकमुळं अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक ट्रेन अंशतः रद्द, तर काही अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

तिसरी मार्गिका सुरू झाल्याने सूरत-उधना दरम्यान दिल्ली-मुंबईच्या दोन्ही अप आणि डाउन मेन लाइनवरील एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरुळीत होईल. जवळपास ४० एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेन सूरत-उधना दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेवर वळवण्यात येतील, असे सांगितले जाते. या मार्गिकेमुळं ट्रेन वेळेत धावतील, याशिवाय ट्रेनची संख्या देखील वाढणार आहे.

Western Railway Mega Block
Shivshahi Bus Accident : बसमध्ये 40 प्रवासी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 200 फूट लांब पडला, पुढे जे घडलं...

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

पश्चिम रेल्वेने २६ ते २८ ऑगस्ट या ५६ तासांच्या ब्लॉकच्या कालावधीत ४८ लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द केल्या आहेत. तर २६ ट्रेन अंशतः रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. २ ट्रेन अन्य मार्गावरून वळवल्या आहेत.

ब्लॉकच्या कालावधीत सर्वाधिक राजस्थानला जाणाऱ्या ट्रेन रद्द होणार आहेत. दादर-अजमेर, दादर-बिकानेर, दादर-भूज, वांद्रे-जयपूर, मुंबई- इंदूर, मुंबई-दिल्ली या ट्रेन रद्द करण्यात येतील.

Western Railway Mega Block
Nagpur News: धक्कादायक वास्तव! आठवी-नववीचे ३,४८७ विद्यार्थी मुख कॅन्सरच्या उंबरठ्यावर; ५२% मुलांना तंबाखूचे व्यसन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com