

कानपूरमध्ये भरधाव कार कालव्यात कोसळली
अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला
मुंडन समारंभावरून परतताना ही घटना घडली
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. कानपूरच्या देहातमध्ये भरधाव कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंडन समारंभावरून परत येत असताना ही घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार कालव्यात पडली. कारमध्ये बघता बघता पाणी शिरले आणि ती कालव्यात बुडाली. पाणी नाका तोंडात गेल्यामुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रसूलाबाद परिसरातील हरी निवाडा गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. भरधाव कार पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी धाडस दाखवत कारच्या काचा तोडल्या त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या चारही तरुणांना तात्काळ रसूलाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण डॉक्टरांनी तपासणी करून तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. तर एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
राजेश श्रीवास्तव, मुम्मू श्रीवास्तव आणि चालक कारिया यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अभिषेकने सांगितल्यानुसार, कारमधील सर्वजण गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते सर्वजण अकौडिया गावात मुंडन संस्कार कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कारने आले होते. या कार्यक्रमावरून परत जात असताना त्यांची कार अनियंत्रित झाली आणि कालव्यात कोसळली.
स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव मदत केली पण अभिषेकचे वडील, काका आणि चालकाचा जीव वाचवू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.