Uttar Pradesh News: मुलाचा मृतदेह पाहताच वडिलांनीही सोडला जीव; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Uttar Pradesh Crime News: एकाच दिवशी मुलासह वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. संजय राजभर आणि जयमंगल राजभर अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत.
Uttar Pradesh News Father and son die on the same day in ghazipur
Uttar Pradesh News Father and son die on the same day in ghazipurSaam TV
Published On

Uttar Pradesh Crime News

मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत गेलेल्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना उत्तरप्रदेशच्या गाझीपूर परिसरात घडली. (Latest Marathi News)

एकाच दिवशी मुलासह वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. संजय राजभर आणि जयमंगल राजभर अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Uttar Pradesh News Father and son die on the same day in ghazipur
Lalit Patil Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस चौकशीत चक्रावून टाकणारी माहिती समोर

मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर परिसरात (Uttar Pradesh) राहणाऱ्या संजय राजभर हा १७ ऑक्टोबर रोजी आपल्या मित्रांसोबत जत्रेत फिरण्यासाठी गेला होता. जत्रेत फिरत असताना संजयचा तेजू बिंद नावाच्या तरुणासोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की संजयने तेजूला मारहाण केली. या मारहाणीत तेजू जखमी झाला.

दरम्यान, तेजूने संजयविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिले. मात्र, संजयने आपल्याला मारहाण केल्याचा राग तेजूच्या मनात होता. याच रागात तो आपल्या मित्रांना घेऊन संजयच्या घरी गेला.

तिथे तेजूने मित्रांच्या साथीने संजयला शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही, तर लोखंडी रॉडने संजूच्या डोक्यात वार देखील केला. यामध्ये संजय हा गंभीर जखमी झाला. आरडाओरड झाल्याने संजयचे कुटुंबिय मदतीसाठी धावले. यानंतर तेजू आणि त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या संजूला कुटुंबियांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना संजूचा मृत्यू झाला. गुरुवारी संजूला मृतदेह अंत्यसंस्काराठी स्मशानभूमीत आणण्यात आला. तिथे मुलाचा मृतदेह पाहून संजूच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. एकाच दिवशी मुलासह वडिलांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी तेजूसह त्याच्या मित्रांना अटक केली आहे.

Uttar Pradesh News Father and son die on the same day in ghazipur
Crime News: संतापजनक! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५ जणांकडून सामूहिक अत्याचार; काळीमा फासणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com