Uttar Pradesh Crime News: धक्कादायक! 29 वर्षांपूर्वी म्हशीला उडवलं, वयाच्या 83 व्या वर्षी बस चालकाविरोधात अटक वॉरंट

Uttar Pradesh News: हा निवृत्त बस चालक आता अर्धांगवायू झालेल्या अवस्थेत पलांगावर झोपलेला असतो.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSAAM TV
Published On: 

Disabled bus driver faces arrest for running over buffalo 29 yrs ago: उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 83 वर्षीय निवृत्त बस चालकाला 29 वर्षांपूर्वी एका म्हशीला उडवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक वॉरंट बजावले आहे. बाराबंकी येथील रहिवासी निवृत्त बस चालक अचहान आता अर्धांगवायू झालेल्या अवस्थेत पलांगावर झोपलेला असतो.

मंगळवारी बरेलीच्या फरीदपूरहून पोलीस पथक अचहानला अटक करण्यासाठी त्याच्या घरी दाखल झालं तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला. उपनिरीक्षक विजय पाल यांनी त्याला वॉरंट दाखवले तेव्हा अचहानला रडू कोसळलं. विजय पाल यांनी त्याला 17 जुलै रोजी न्यायालयात हजर न झाल्यास त्याला अटक करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे सांगितले.

Uttar Pradesh Crime News
Rain Orange Alert: राज्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार! सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

अचहानचा मुलगा इंतेझार याने सांगितले की, "माझ्या वडिलांनी राज्य परिवहन महामंडळात ड्रायव्हर म्हणून संपूर्ण कारकीर्द घालवली. त्यांना या वयात आणि अशा स्थितीत या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची कल्पना कोणीही केली नव्हती." (Marathi Tajya Batmya)

सन 1994 मध्ये अचहान लखनऊहून कैसरबागमार्गे बरेलीला जाणारी सरकारी बस चालवत होता. तेव्हा फरीदपूरमधून जात असताना त्याच्या बसने रस्त्यावरील एका म्हशीला धडक दिली. त्यानंतर त्या म्हशीच्या मालकाने अचहानविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयपीसीच्या कलम 279 नुसार अचहानवरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची बसही जप्त करण्यात आली. परंतु नंतर काही वेळाने सोडण्यात आली. त्यानंतर अचहान निवृत्तीपर्यंत सेवेत कायम राहिला. (Crime News)

Uttar Pradesh Crime News
Pune Crime News: प्रॉपर्टी खाली करा नाही तर मारून टाकू, पुण्यातील प्रसिद्ध 'वैशाली' हॉटेलमध्ये टोळीचा राडा

उपनिरीक्षक विजय पाल सध्या या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. त्यांनी बुधवारी TOI ला सांगितले की, अटक वॉरंटची माहिती मिळाल्यानंतर अचहानने वकिलाची मदत घेतली. "परिवाराने आम्हाला कळवले आहे की ते नेमलेल्या तारखेला बरेली कोर्टात हजर राहणार आहे." (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.