इन्स्टंट नूडल्स (Instant Noodles) खाणं एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. नूडल्स खाल्ल्यामुळे एका ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर ५ सदस्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पीलीभीतमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची प्रकृती बिघडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या पीलीभीतच्या पुरनपूर तहसील भागातील राहुल नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. उत्तराखंडच्या देहराडूनमध्ये राहणारी महिला आपल्या ३ मुलांसोबत पीलीभीत येथील आपल्या माहेरी आली होती. गुरुवारी संध्याकाळी सर्वांनी नूडल्स आणि भात खाल्ला. काही वेळाने सर्वांना उलट्या होऊ लागल्या आणि हळूहळू सर्वांची प्रकृती खालावत गेली. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
राहुल कुमार असं या सात वर्षांच्या मुलाचे नाव आहे. तर उर्वरित सर्वांवर पुरणपूर येथील सीएचसीमध्ये उपचार सुरू आहे. राहुलच्या भावाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित सर्वांवर सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत. नूडल्स खाल्ल्यानंतर या सर्वांना पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच गंभीर होत गेली.
या घटनेनंतर अन्न निरीक्षक त्यांच्या पथकासह राहुलच्या आजोबांच्या घरी पोहचले. मात्र कुटुंबीयांनी त्याच दिवशी स्टोव्हमध्ये नूडल्सचे रॅपर जाळून टाकले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनासह अन्न निरीक्षक सतीश हे ज्या दुकानातून नूडल्स खरेदी केले होते त्या दुकानात पोहोचले. अन्न निरीक्षकांनी घटनास्थळी सापडलेल्या सर्व नूडल्सच्या पाकिटांचे नमुने घेतले आहेत.
अन्न निरीक्षक सतीश कुमार यांनी सांगितले की, एका कुटुंबाने नूडल्स खाल्ले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंब आजारी पडले. एका मुलाचा मृत्यू झाला असून 5 जण अजूनही आजारी आहेत. कुटुंबीयांनी नूडल्सचे पॅकेट जाळले आहे. त्यामुळे आम्ही ज्या दुकानातून नूडल्स खरेदी केले होते त्या दुकानात गेलो आणि घटनास्थळी सापडलेल्या सर्व नूडल्सचे नमुने घेतले असून सध्या तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.