CBSE 12th Results 2024: छत्रपती संभाजीनगरच्या चैत्राची उत्तुंग भरारी; CBSE 12 वी बोर्डाच्या परीक्षेत राज्यात आली पहिली

CBSE Board 12th Maharashtra Topper: चैत्राने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 500 पैकी 497 मार्क घेतले असून ती 99.4% टक्क्यांनी पास झाली आहे. तिने राज्यातील सर्व विभागातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवलाय.
CBSE 12th Results 2024
CBSE 12th Results 2024Saam TV

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

काल मंगळवारी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी सर्वत्र आनंद व्यक्त केला. अशात छत्रपती संभाजी नगरची चैत्रा दिवान या विद्यार्थिनीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेत यशाला गवसणी घालत तिने उत्तुंग भरारी घेतली आहे.

CBSE 12th Results 2024
CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

चैत्राने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 500 पैकी 497 मार्क घेतले असून ती 99.4% टक्क्यांनी पास झाली आहे. तिने राज्यातील सर्व विभागातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवलाय. विशेष म्हणजे कला विभागात शिक्षण घेऊन चैत्राने वाणिज्य, विज्ञान आणि कला या तिन्ही क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांका स्थानी आपलं नाव कोरलं आहे.

तिन्ही विभागांतून चैत्रा प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाल्याने तिच्या या कामगिरीचे सर्वच स्थरातून भरभरून कौतुक होत आहे. बोर्डाच्या परीक्षेला सर्व मुलं जास्तीचे शिकवणी वर्ग, महागडे क्लास जॉइन्ड करतात. मात्र चैत्राने कोणत्याही क्लास शिवाय स्वत:च्या हिंमतीवर यशाचा शिखर गाठला आहे.

चैत्राच्या कुटुंबाविषयी माहिती

चैत्राचे आई-वडील हे पेशाने डॉक्टर आहे. परंतू, या विद्यार्थीनीला आता पुढील शिक्षण मानसशास्त्र विषयात करण्याची इच्छा आहे. मानसशास्त्रातच पुढे ती पीएचडी करणार असल्याचं तिने स्वत: सांगितलं आहे.

दरम्यान, एरवी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे किंवा नागपूर या जिल्ह्यातील विद्यार्थी प्रथम क्रमांकाने पास होतात, मात्र यावेळी छत्रपती संभाजी नगरच्या या विद्यार्थिनीने सीबीएससी परीक्षेत भरारी घेतली आहे. यामुळे चैत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

CBSE 12th Results 2024
CBSE Board 10th Result 2024: CBSE १० वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; परीक्षेचा निकाल जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com