Char Dham Yatra 2024: चारधामला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॉफिक जाम; ६ भाविकांचा मृत्यू

Char Dham Yatra 2024 Traffic: गंगोत्री-यमुनोत्री महामार्गावर भाविकांची गर्दी झाली वाहतूक कोंडी झालीय. पोलिसांनी अनेक ठिकाणी गेट यंत्रणा बसवली असून वाहनं एकेरी मार्गाने सोडल्या जात आहेत. जेथे-जेथे गेट सिस्टीम लावण्यात आलीय. तेथे भाविकांसाठी निशुल्क खाण्या-पिण्याची सुविधा ठेवण्यात आलीय.
Char Dham Yatra 2024 Accident: Six People Died Till 15 May in Gangotri Yamunotri Dham
Char Dham Yatra 2024 Accident: Six People Died Till 15 May in Gangotri Yamunotri DhamSaam Tv

नवी दिल्ली: चार धामच्या यात्रा १० मे पासून सुरू झाली असून भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेला जात आहे. भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने भाविकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी केलीय. यादरम्यान यमुनोत्री धाममध्ये २ भाविकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसांत ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

Char Dham Yatra 2024 Accident: Six People Died Till 15 May in Gangotri Yamunotri Dham
Tourist Places in Rishikesh: ऋषिकेश जवळील नयनरम्य ठिकाणं; कमी खर्चात करा भरपूर एन्जॉय

गंगोत्री-यमुनोत्री महामार्गावर भाविकांची गर्दी झाली वाहतूक कोंडी झालीय. पोलिसांनी अनेक ठिकाणी गेट यंत्रणा बसवली असून वाहने एकेरी मार्गाने सोडल्या जात आहेत. जेथे-जेथे गेट सिस्टीम लावण्यात आलीय. तेथे भाविकांसाठी निशुल्क खाण्या-पिण्याची सुविधा ठेवण्यात आलीय. गेट सिस्टीम ठेवल्यानं भाविकांची गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मिळालेल्या महितीनुसार १ लाख ७ हजार ५३६ भाविकांनी गंगोत्री आणि यमुनोत्री धामला भेट दिलीय. ज्यामध्ये ५९ हजारांहून अधिक भाविकांनी यमुनोत्री धामला तर ४८ हजार भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिलीय. याचबरोबर बद्रीनाथ धाममध्येही भाविकांची गर्दी वाढलीय.

Char Dham Yatra 2024 Accident: Six People Died Till 15 May in Gangotri Yamunotri Dham
Rajasthan News: १३ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन, खाणीत अडकलेल्या १४ अधिकाऱ्यांची सुटका; एकाचा मृत्यू

चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत २६ लाख ७३ हजार भाविकांनी नोंदणी केलीय. तर १ लाख २६ हजार भाविकांनी दर्शन घेतलंय. केदारनाथ धामला आतापर्यंत १ लाख २६ हजार भाविकांनी तर बद्रीनाथ धामला ३९ हजार भाविकांनी, गंगोत्री धामला ४८ हजारांनी आणि यमनोत्री धामला ५९ हजारांनी भेट दिलीय.चारधाम यात्रेदरम्यान यात्रेकरूंची गर्दी आणि ट्रॉफिक जाममुळे होणाऱ्या समस्यांबाबत आयुक्त गढवाल पत्रकार परिषद घेणार आहेत. याशिवाय यात्रेदरम्यान धामांमध्ये होणाऱ्या आंदोलनाबाबतही माहिती देणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com