

Summary -
उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी कोर्टात धाव घेत घटस्फोटाची मागणी केली
मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाने तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे कबूल केले
तरुणीने फसवणूक झाल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज केला
वैद्यकीय अहवालात नवरा बाप होऊ शकत नाही हे उघड झाले
उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीने लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कोर्टात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. मधूचंद्राच्या रात्री या तरुणीच्या नवऱ्याने मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे तिला सांगितले. आपली फसवणूक झाल्यामुळे संतापलेल्या तरुणीने वडिलांसह पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये तिने नवरा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा आणि लग्नात फसवल्याचा आरोप केला.
तरुणीच्या कुटुंबियांनी नवरदेवाच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली. वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये तो बाप होऊ शकत नाही ही बाब समोर आल्याने तरुणीचे कुटुंबीय आणखी आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी भेटवस्तू आणि लग्नाचा खर्च परत करण्याची मागणी केली. तरुणीने नवऱ्याला पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, 'मी शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीसोबत माझे आयुष्य घालवू शकत नाही. लग्नाच्या रात्री त्याने स्वतः मला तो शारीरिकदृष्ट्या सक्षम मनसल्याचे सांगितले तेव्हा मला हे कळले.
नवरदेव २५ वर्षांचा आहे. तो सहजनवा येथील एका श्रीमंत शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे आणि गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या औद्योगिक युनिटमध्ये अभियंता म्हणून काम करतो. त्याने बेलीपार येथील एका तरुणीसोबत थाटामाटात लग्न केले. पण मधुचंद्राच्या रात्री त्याने बायकोला मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे सांगितल्याने ती संतापली आणि तिने कोर्टात धाव घेत नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिची फसवणूक केल्याचा आरोप केला.
या तरुणीचे लग्न नातेवाईकांच्या ओळखीतून ठरले होते. २८ नोव्हेंबरला थाटामाटात त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती सासरी गेली. पण मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याचे सत्य समोर आले. १ डिसेंबर रोजी तरुणीचे वडील पारंपारिक विधींसाठी तिच्या सासरच्या घरी आले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. जावई शरीरानं सक्षम नाही हे कळाल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. दोन्ही कुटुंबीयांची बैठक झाली पण या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. पण नंतर नवरदेवाच्या कुटुंबाने लग्नाचा खर्च ७,००,००० रुपये आणि सर्व भेटवस्तू एका महिन्याच्या आत परत करण्यास सहमती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.