बदली एक्सप्रेस सुसाट! तब्बल 12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

Full List Of 12 IPS Officers Transferred In Uttar Pradesh: उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 12 अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
UP Government Transfers 12 IPS Officers in Major Administrative Reshuffle to Strengthen Law and Order
UP Government Transfers 12 IPS Officers in Major Administrative Reshuffle to Strengthen Law and OrderSaam tv
Published On

उत्तरप्रदेशमध्ये बदली एक्सप्रेस सुसाट धावत असून एका दिवसात 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता तब्बल 12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याआधी देखील IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा बदल केला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

UP Government Transfers 12 IPS Officers in Major Administrative Reshuffle to Strengthen Law and Order
भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! राजकीय वर्तुळात शोककळा

कोणाची कुठे करण्यात आली नियुक्ती?

सहारनपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर जैन यांची प्रयागराज पोलीस आयुक्तालयात पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोंडा (पूर्व) येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज कुमार रावत यांची संभल (दक्षिण) येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मेरठ शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंह यांच्याकडे बहराइच शहराच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सीतापूरचे सहायक पोलीस अधीक्षक विनायक गोपाल भोसले यांची मेरठ शहराच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मेरठ जिल्ह्याचे सहायक पोलीस अधीक्षक अंतरीक्ष जैन यांची बुलंदशहर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या सहायक पोलीस आयुक्त ट्विंकल जैन यांची लखनौ पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस उपआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

गाझियाबाद पोलीस आयुक्तालयाच्या सहायक पोलीस आयुक्त, लिपी नागायच यांची वाराणसी पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

UP Government Transfers 12 IPS Officers in Major Administrative Reshuffle to Strengthen Law and Order
Stampede : चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ऐतिहासिक किल्ल्यावरील उत्सवात गदारोळ

प्रयागराज पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त राजकुमार मीना यांची मिर्झापूर (नक्षल) येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लखनौ पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त, ऋषभ रुणवाल यांची सोनभद्र (नक्षल) येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संभलचे सहायक पोलीस अधीक्षक आलोक कुमार यांच्याकडे प्रतापगड शहर पूर्वच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाराणसी पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. इशान सोनी यांना जालौनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक करण्यात आले आहे.

अलीगढचे सहायक पोलीस अधीक्षक मयंक पाठक यांची सहारनपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com