नवरा OYOमध्ये प्रेयसीच्या मिठीत, बायकोनं रंगेहाथ पकडलं, प्रेयसीच्या झिंज्या उपटून बेदम चोपलं

Crime Viral News: पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं. बायकोनं सार्वजनक ठिकाणी दोघांना चोपलं. पोलिसांनी तिघांना समजवण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.
Uttar Pradesh Gorakhpur Crime
Uttar Pradesh Gorakhpur CrimeSaam
Published On
Summary
  • बायकोनं नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं.

  • बायकोनं दोघांना रस्त्यावर बेदम चोपलं.

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवऱ्याच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागताच बायकोनं त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर बायकोनं नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेनं दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी हा हायव्होल्टेज ड्रामा पाहून परिसरात गर्दीही जमली.

प्रेयसीला मारहाण होताना पाहून महिलेच्या पतीनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर अर्धा तास तिघांचा वाद सुरू होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेच्या पतीला आणि त्याच्या प्रेयसीला पोलीस ठाण्यात नेले. पण पोलीस ठाण्यात नेत असतानाही महिलेनं नवऱ्याच्या प्रेयसीचे केस ओढले. तसेच बेदम मारहाण केली.

Uttar Pradesh Gorakhpur Crime
खवय्यांना धक्का! मासळीच्या किमतीत वाढ, कारण ठरलंय बर्फ, किती रूपयांनी होणार वाढ?

पोलीस पथकानं तिघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही समजून घेण्यास तयार नव्हते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. खजनी परिसरात राहणाऱ्या या महिलेचे तीन वर्षांपूर्वी तरूणाशी लग्न झाले होते.

Uttar Pradesh Gorakhpur Crime
भर दुपारी घरात घुसला, १७ वर्षीय तरूणीवर सपासप चाकूनं वार; CCTV मुळे आरोपीचं पितळ उघड

दोघांना दीड वर्षांची मुलगी आहे. महिलेला तिच्या नवऱ्यावर संशय होता. बदलत्या स्वभावामुळे महिला नवऱ्यावर संशय घेत होती. तिनं १९ सप्टेंबर रोजी नवऱ्याचा पाठलाग केला. नवरा थेट गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला. संशय सत्यात उतरताना पाहून महिलेला राग अनावर झाला. महिला थेट खोलीत गेली. दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहून महिलेनं नवऱ्याला जाब विचारला.

Uttar Pradesh Gorakhpur Crime
भाजप नेत्याचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यात गोळी लागली अन् बाजूला पिस्तूल; नेमकं काय घडलं?

तसेच दोघांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली. महिलेनं नवऱ्याच्या प्रेयसीचे केस ओढले. तसेच कानशिलातही लगावली. गिडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नाही. जर, तक्रार दाखल केली तर कारवाई केली जाईल, असं पोलीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com