Shocking : जिममध्ये रक्तरंजित थरार! आधी केक कापून तोंडाला लावला, नंतर गोळीबार; तिघांचा मृत्यू

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. किरकोळ वादाचे भीषण रूपांतर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Shocking : जिममध्ये रक्तरंजित थरार!  आधी केक कापून तोंडाला लावला, नंतर गोळीबार; तिघांचा मृत्यू
Uttar Pradesh Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • बुलंदशहरमध्ये जिममध्ये गोळीबाराची घटना

  • वाढदिवसाच्या पार्टीतील वादामुळे प्रकार घडला

  • तीन तरुणांचा जागीच मृत्यू

  • पोलिसांकडून तपास सुरू, संशयित ताब्यात

  • परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण

Uttar Pradesh Gun Firing in Gym 3 Dead उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाने भीषण वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुर्जा नगर कोतवाली परिसरातील नेहरूपूर चुंगी जवळील सुभाष रोडवरील एका जिममध्ये झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही मित्र जिममध्ये वाढदिवस साजरा करत होते. केक कापल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर केक फासून आनंद व्यक्त केला. मात्र, याच वेळी झालेल्या थट्टामस्करीतून वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती इतकी चिघळली की, अचानक गोळीबार सुरू झाला.

Shocking : जिममध्ये रक्तरंजित थरार!  आधी केक कापून तोंडाला लावला, नंतर गोळीबार; तिघांचा मृत्यू
Pune : पुण्यात चोरीचा थरार, तरुणाने थेट PMPML ची बस चोरून सुसाट पळवली; नेमकं काय घडलं?

प्रत्यक्षदर्शींच्या मते, या गोळीबारात अनेक राउंड फायर करण्यात आले. ज्यामुळे जिममध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. मात्र या गोळीबारात तीन तरुणांना डोक्यात गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी डीआयजी कलानिधी नैथानी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Shocking : जिममध्ये रक्तरंजित थरार!  आधी केक कापून तोंडाला लावला, नंतर गोळीबार; तिघांचा मृत्यू
Crime News : संतापजनक! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं; ९वीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार

एसएसपी दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे वाढत्या गुन्हेगारीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com