Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

Uttarpradesh Triple Murder Case News : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये १६ वर्षीय मुलाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
GORAKHPUR TRIPLE MURDER: 16-YEAR-OLD BOY KILLS BROTHER, SISTER-IN-LAW AND NEPHEW OVER FAMILY DISPUTE IN UP
GORAKHPUR TRIPLE MURDER: 16-YEAR-OLD BOY KILLS BROTHER, SISTER-IN-LAW AND NEPHEW OVER FAMILY DISPUTE IN UPSaam Tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये धक्कादायक घटना

  • 16 वर्षीय मुलाकडून तिहेरी हत्याकांड

  • आरोपीने मोठा भाऊ, वहिनी आणि 3 वर्षीय पुतण्याची झोपेत केली हत्या

  • पोलिस तपास सुरू

Uttar Pradesh Triple Murder Case News उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या मोठ्या भावाची, वहिनीची आणि तीन वर्षांच्या पुतण्याची गाढ झोपेत असताना निर्घृण हत्या केली. या घटनेत नऊ वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली असून तिनेच कुटुंबीयांना आणि नंतर पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. धक्कादायक म्हणजे ही हत्या किरकोळ वादातून केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर अमित गुप्ता, त्यांची पत्नी रंजना, नऊ वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा रेयांश हे राहत होते. तर आरोपी धाकटा भाऊ वरच्या मजल्यावरील खोलीत राहत होता. पहाटे आरोपी अचानक अमित यांच्या खोलीत शिरला. त्या वेळी सर्वजण गाढ झोपेत होते. त्याने धारदार शस्त्राने मोठा भाऊ अमित, वहिनी रंजना आणि लहान मुलगा रेयांश यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नऊ वर्षांच्या मुलीने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा करत खोलीबाहेर धाव घेतली. तिच्या आवाजाने घरी असलेल्या आजी-आजोबांची झोप उडाली.

GORAKHPUR TRIPLE MURDER: 16-YEAR-OLD BOY KILLS BROTHER, SISTER-IN-LAW AND NEPHEW OVER FAMILY DISPUTE IN UP
Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

मुलीच्या आवाजाने अमितचे वडील हरीलाल गुप्ता घटनास्थळी पोहोचले असता खोलीत रक्ताचा सडा पडलेला होता. आरोपी हातात रक्ताने माखलेले शस्त्र घेऊन बाहेर येताना दिसला. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर जाऊन शांतपणे बसल्याचे सांगितले जाते. यानंतर हरीलाल गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले.

GORAKHPUR TRIPLE MURDER: 16-YEAR-OLD BOY KILLS BROTHER, SISTER-IN-LAW AND NEPHEW OVER FAMILY DISPUTE IN UP
Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

प्राथमिक तपासात कुटुंबाच्या किराणा दुकानावरून दोन्ही भावांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. मोठा भाऊ काही वर्षांपूर्वी बाहेरून गावी परतल्यानंतर दुकानाच्या कामात सहभागी झाला होता. यामुळे धाकटा भाऊ नाराज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तसेच आरोपी दारूच्या व्यसनामुळे घरात वारंवार वाद घालत असल्याचाही दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com