Drawn
DrawnSaam TV

UP News: उत्तर प्रदेशात बोट उलटली; 25 जण बुडाले, तिघांचा मृत्यू

आतापर्यंत 20 लोकांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 7 जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Published on

लखनौ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील मोहम्मदपूर खला परिसरात सुमाली नदीत एक बोट बुडाली आहे. या बोटीत 25 हून अधिक जण प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक रहिवाशी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदतीने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 20 लोकांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 7 जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नदीपलीकडील गावात कुस्तीचे सामने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कुस्ती पाहण्यासाठी सर्व लोक बोटीने सामुली नदी ओलांडून जात होते. त्यानंतर बोट मध्यभागी येताच तोल बिघडला आणि बोट उलटली.

Drawn
'कोयना'च्या सर्ज वेलमधील गळती किती धोकादायक; धरणाच्या माजी मुख्य अभियंत्यांनी दिली माहिती

मृतांच्या नातेवाईकांना 4-4 लाख रुपयांची मदत

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी पीडित कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना आपत्ती निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

Drawn
Weather Updates : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस, या राज्यांना अलर्ट

जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले की, सालपूर गावातील 20 लोक बोटीने नदी पार करत होते. अचानक बोटीचा तोल बिघडला आणि क्षमतेपेक्षा जास्त जण उपस्थित असल्याने बोट उलटली. कुमार यांनी सांगितले की, बोटीतील 13 लोक पोहत बाहेर आले, मात्र सात जण पाण्यात बुडू लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com