'कोयना'च्या सर्ज वेलमधील गळती किती धोकादायक; धरणाच्या माजी मुख्य अभियंत्यांनी दिली माहिती

वीज ग्रहाला जलाशयाला किंवा डोंगराला यामुळे कोणताही धोका नाही, असं दीपक मोडक यांनी म्हटलंय.
Koyna Dam
Koyna DamSaam TV

रत्नागिरी : कोयना धरणातून (koyna dam) वीजनिर्मिती प्रकल्पाकडे जाणाऱ्या सर्ज वेलला दोन वर्षांपूर्वी भागदाड पडलं होतं. यातून मोठी गळती होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यामुळे कोणताही धोका नसल्याचा दावा कोयना धरणाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी केला आहे.

कोयना प्रकल्पाच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टावरमधून जे अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघतं, या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. ही सर्ज वेल 1960 साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात 100 मीटर खोल खोदलेली आहे आणि त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे. (Maharashtra News)

ही विहीर गेली साठ वर्ष तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेलमधून हे झिरपलेलं पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयार यामध्ये जातं आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडतं. वीज ग्रहाला जलाशयाला किंवा डोंगराला यामुळे कोणताही धोका नाही, असं मोडक यांनी म्हटलंय.

Koyna Dam
Koyna Dam : 'काेयने' मुळे 'वाशिष्ठी' ला पूराचा धाेका; पोफळी वीज निर्मिती प्रकल्प अधिकाऱ्यांना भीती

केवळ पाणी वाया जात आहे एवढेच नुकसान आहे. हे पाणी साधारण तीन घनफूट प्रति सेकंद एवढं असावं. सर्ज वेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सहज सोपं नाही. दुरुस्तीसाठी वीज निर्मिती बंद ठेवावी लागेल आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे, असंही मोडक यांनी सांगितलं.

या सर्व कारणामुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळलेलं आहे. यात घाबरण्यासारखी किंवा गोंधळल्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून पाणी झिरपत असल्याची बातमी सर्व वृतवाहिन्यांवर सुरू होती. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती, त्यांतर दीपक मोडक यांनी हा दावा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com