

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अखिलेश यादव यांचा बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये रोडशो झाला. या रोडशोनंतर अखिलेश यादव यांची जाहीर सभा झाला. या सभेदरम्यान अखिलेश यादव यांनी जागा वाटपासंदर्भात केलेल्या मोठ्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. सध्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. यादरम्यान अखिलेश यादव यांनी तुझं-माझं चालायचं नाही असं विधान केले.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले की, 'ज्या इंडिया आघाडीसोबत आम्ही निवडणूक लढवली. त्या इंडिया आघाडीत अनेक जण शेवटच्या क्षणी सहभागी होणार आहेत. एका मित्रपक्षाने ३६ जागांची मागणी केली आहे. मित्रपक्ष हा मित्रपक्षच राहतो पण तो ज्या पक्षाला पाठिंबा देतो तो बदलून जातो.'
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या चर्चेसंदर्भात देखील त्यांनी या सभेत मोठं विधान केले. ते म्हणाले, 'बऱ्याचदा असं होतं की अनेक जागा यादीमध्ये नसतात पण योग्य पद्धतीने मूल्यांकन केल्यानंतर त्या जागादेखील जिंगण्यायोग्य होतात. आमची वृत्ती हे तुझं हे माझं अशी नाही आहे. उलट सर्व विजयी उमेदवारांचा निर्णय आम्हीच घेऊ.'
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, 'जर आमच्याकडे ४०३-४०३ विजयी उमेदवार असतील तर आमच्याकडे एकूण ८०६ प्रबळ उमेदवार असतील. एकदा उमेदवारांची घोषणा झाली की ते इंडिया आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे आम्ही जनतेला सहजपणे अपील करू शकतो.' उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा कधी होणार? या प्रश्नावर उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले की, 'एकादशीनंतर लवकरच तारीख ठरवली जाईल आणि त्याचवेळी आमची बैठक निश्चित केली जाईल.'
२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात बैठकांवर बैठका सुरू आहेत. दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. काँग्रेसची १८१ जागांची मागणी केली असल्याची माहिती अखिलेश यादव यांनीच सांगितली होती. काँग्रेस उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ४०३ जागांपैकी १८१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेसने अखिलेश यादव यांच्याकडे यासंदर्भात मागणी देखील केली. याबाबत काँग्रेसचे असे म्हणणे आहे की, जागावाटपाचा अंतिम निर्णय परस्पर विचारविनिमय आणि उमेदवारांच्या जिंकण्याच्या क्षमतेवर आधारित असेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.