Uttarakhand Tunnel Accident: उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेले मजूर सुटकेचा नि:श्वास घेणार, मजुरांचा जीव वाचविण्साठी ५ प्लान तयार

Uttarakhand Tunnel Accident: मजूर गेल्या १० दिवसांपासून अद्याप बोगद्यात अडकले आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सरकारने पाच प्लान तयार केल्याची माहिती हाती आली आहे.
Uttarakhand Tunnel:
Uttarakhand Tunnel:yandex
Published On

Uttarakhand Tunnel Accident:

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे १२ नोव्हेंबर रोजी मोठी दुर्घटना घडली. या भागात सिल्कियारा बोगद्याचं काम सुरू असताना काही भाग कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर या बोगद्यात ४१ मजूर अडकले. हे मजूर गेल्या १० दिवसांपासून अद्याप बोगद्यात अडकले आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सरकारने पाच प्लान तयार केल्याची माहिती हाती आली आहे. (Latest Marathi News)

उत्तराखंडच्या सिलिक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना लवकरच बाहेर काढण्यात येणार आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अडीच दिवसांत बाहेर काढणार असा दावा रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी केला आहे.

सध्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ड्रिलिंग सुरु करण्यात आले आहे. या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून पाच प्लान तयार केले आहेत. या प्लानवर सरकारचं काम सुरु आहे.

Uttarakhand Tunnel:
Israel-Hamas War Update : इस्रायल-हमासमध्ये तात्पुरता युद्धविराम; गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी युद्ध थांबणार

सरकारने मजुरांचा जीव वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय टनल एक्सपर्ट अल्बर्टो ड्रिक्स यांना मदतीसाठी बोलावलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी सांगितलं की, 'बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग सुरु केली आहे. तो सर्वात चांगला पर्याय आहे. आम्हाला विश्वास आहे की, या मजुरांना पुढील अडीच दिवसांत बाहेर काढू. सरकार अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ५ प्लानवर काम करत आहे. सुरुवातीला आडव्या पद्धतीने ड्रिलिंग सुरु होतं, पण त्याला खूप वेळ लागत होता. आता उभ्या पद्धतीने ड्रिलिंग करण्याचं काम सुरु आहे.

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सरकारच्या विविध एजन्सी काम करत आहेत. सरकार मजुरांचं मनोबल वाढविण्यासाठी सदैव त्यांच्या संपर्कात राहत आहे. पाईपलाइनमार्फत मजुरांपर्यंत गरजेच्या वस्तू पोहोचविण्यात आल्या आहेत. सध्या बचाव पथकाने बोगद्यात ६ इंची पाईप टाकण्याचे काम वेगाने सुरू केलं आहेत. या मजुरांचा व्हिडिओही समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uttarakhand Tunnel:
Myanmar: नागरिकांनो! म्यानमारचा प्रवास करणं टाळा; हिंसाचाराच्या दरम्यान भारत सरकारकडून मार्गदर्शन सुचना जाहीर

बोगदा बांधकाम तज्ज्ञांनी सांगितली चूक

बोगद्यात अडकलेले मजूर याआधी मुरमुरे, उकडलेले आणि भाजलेले हरभरे आणि सुका मेवा खात होते. त्यानंतर आता बचाव पथकाने त्यांच्यापर्यंत फळ, खिचडी, पाणी आणि ऑक्सिजन पोहोचवलं आहे. बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला असल्याचे बोगदा बांधकाम तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com