Israel-Hamas War Update : इस्रायल-हमासमध्ये तात्पुरता युद्धविराम; गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी युद्ध थांबणार

Israel-Hamas War Update : शांतता आणि युद्धविरामाच्या आवाहनांदरम्यान इस्रायलने नरमाईची भूमिका घेतली आहे.
Israel-Palestine Tension
Israel-Palestine TensionSaam TV
Published On

Israel-Hamas War :

इस्रायलवर हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यापासून हे युद्ध सातत्याने सुरू आहे. एक महिन्याहून अधिक काळ झाला तरी संघर्ष सुरुच आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

शांतता आणि युद्धविरामाच्या आवाहनांदरम्यान इस्रायलने नरमाईची भूमिका घेतली आहे. बुधवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने तात्पुरत्या युद्धबंदीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे गाझा पट्टीत ओलिस ठेवलेल्या नागरिकांना लोकांना स्वातंत्र्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Israel-Palestine Tension
Nagpur News: भरकटलेले विमान महिला पायलटने 'टॅक्सी वे'वर उतरवलं; लँडिंगनंतर परिसरात एकच खळबळ

इस्रायल सरकारच्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हमासच्या सैनिकांनी लोकांना ओलीस बनवून गाझा पट्टीत नेले होते. इस्रायलचा असा विश्वास आहे की हमासने गाझा पट्टीमध्ये 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे ज्यात वृद्ध लोक आणि महिला आहेत.

Israel-Palestine Tension
Pune ST Bus Accident: पुण्यात भरधाव एसटीचा अचानक ब्रेक फेल, ७ वाहनांना उडवले

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार दिवसांच्या अंतराने 50 महिला आणि मुलांना सोडण्यात येईल. या काळात कोणत्याही प्रकारच्या युद्धावर बंदी असेल. सोडण्यात आलेल्या प्रत्येक अतिरिक्त 10 ओलिसांसाठी युद्धविराम आणखी एक दिवस वाढवला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com