इराणमध्ये घुसणार अमेरिकेची 'स्पेशल फोर्स'?काय आहे अमेरिकेचं 'ऑपरेशन युरेनियम' ?

US-Israel Strategy: इराणवर हवाई हल्ले करूनही इस्त्रायल-अमेरिकेला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. त्यात इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेनं आता नवा मास्टरप्लॅन आखलाय. हा नवा मास्टरप्लॅन नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
US Reportedly Plans Secret Operation To Capture Iran’s Enriched Uranium And Disrupt Its Nuclear Program.
US Reportedly Plans Secret Operation To Capture Iran’s Enriched Uranium And Disrupt Its Nuclear Program.Saam Tv
Published On

इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेनं आता थेट 'ग्राउंड ऑपरेशन'ची तयारी केलीय..इराणमध्ये घुसून अमेरिका आता ऑपरेशन युरेनियम राबवणार आहे... इराण कितीही प्रतिकार करत असला तरी इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्धवस्त करणं इस्त्रायल-अमेरिकेचं लक्ष्य आहे. अण्वस्त्र चाचणीला धक्का देण्यासाठी अमेरिकेनं स्पेशल फोर्सच्या माध्यमातून काय रणनिती आखलीय ? पाहूयात...

इराणमधील 60% समृद्ध युरेनियम जप्त करण्यासाठी अमेरिका-इस्रायलची गुप्त चर्चा झालीय...आता हवाई हल्ला नाही तर थेट इराणी भूमीवर स्पेशल फोर्स उतरवण्याचा पर्याय अमेरिकेनं स्वीकारलाय...कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाही, ही अमेरिकेची ठाम भूमिका आहे... इराणकडील 450 किलो युरेनियम जप्त करणं, अमेरिकेचं या ऑपरेशनमागील उद्दीष्ट आहे...दरम्यान अमेरिकेचं ऑपरेशन युरेनियम नेमकं कधी राबवलं जाणार ?आणि यात कोणाचा सहभाग असणार? पाहूयात...

इराणी सैन्याचा धोका निर्माण होणार नाही, तेव्हाच हे ऑपरेशन राबवले जाईल... तसचं जमिनीवरील युद्धजन्य परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येईल, तेव्हाच अमेरिका या ऑपरेशनला सुरुवात करेल... या ऑपरेशनमधील स्पेशल फोर्समध्ये गुप्त आणि प्रशिक्षित सैनिक असतील... ज्यात सैनिकांसह अणुशास्त्रज्ञांचाही समावेश असेल.. यामागे इराणमधून युरेनियम ताब्यात घेणे किंवा युरेनियम समृद्धीकरण क्षमता अणुतज्ज्ञांच्या मदतीनं कमी करणे, हे मुख्य उद्देश असेल...

एकीकडे युद्धाची खुमखुमी असलेल्या अमेरिकेची ही कारवाई इराणच्या मुळावरच घाव घालणारी ठरणारेय. तर दुसरीकडे, ही कारवाई धोकादायक आणि गुंतागुंतीची मानली जातेय...कारण, इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला कऱणं इतकं सोप्पं नाही... आधीच अमेरिकेला इराणवर हवाई हल्ले करून अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे अमेरिका आता थेट इराणच्या जमिनीवर उतरण्यासाठी सज्ज झालीय...आता युरेनियम साठा ताब्यात घेऊन अमेरिका इराणच्या स्वप्नांना धुळीस मिळवणार की अण्वस्त्रांचा धोका कायम राहणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com