UPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर; कसा पाहाल ऑनलाइन निकाल? वाचा

UPSC Mains Result update : यूपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. यूपीएससीच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झालाय.
UPSC Exam
UPSC Saam Tv
Published On

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. दोन अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. या मुलाखतीत ज्यांची निवड होईल, त्यांची निवड आयएएस, आयपीएस आणि आयएफएस या सेवांसाठी निवड होईल.

यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात मुलाखत घेतली जाते. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा १६ जूनपासून आयोजित केली होती. तर मुख्य परीक्षा २०,२१,२२,२८ आणि २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

मुलाखत कधी होणार?

यूपीएससीच्या एकूण १ हजार पदांसाठी भरती होणार आहे. मेरिटनुसार, सर्वाधक गुण मिळवणारे उमेदवार आयएसएस, आयएफएस, भारतीय पोलीस सेवा आणि अन्य केंद्रीय सेवा आणि पदांच्या भरतीसाठी पात्र राहील. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार १३ ते १९ डिसेंबरपर्यंत डिटेल अॅप्लिकेशन फॉर्म २ भरून जमा करावा लागणार आहे.

UPSC Exam
Maharashtra Assembly Result: लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं खरं, पण विधानसभेतील महिला आमदारांची संख्या घटली

निकाल कसा पाहाल?

तुम्ही निकाल हा यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकता.

होम पेजवर Whats New पर्यायावर क्लिक करा.

पुढे UPSC CSE Mains Result 2024 Download लिंकवर क्लिक करा.

लिंक ओपन झाल्यावर तुम्ही निकाल पाहू शकता.

उमेदवार निकालाची सॉफ्ट कॉपी सेव्ह करून त्याची प्रिंटआऊट काढू शकतो.

UPSC Exam
UPSC Exams : सरकारी अधिकारी व्हायचंय? या 5 चुका करणे टाळाच
UPSC Exam
NEET UG Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NEET UG परिक्षांची तारीख जाहीर होणार; रजिस्ट्रेशन कसं करावं? जाणून घ्या

कागदपत्रे तयार ठेवा

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, ईडब्लूएस, पीडब्लूबीडी , माजी सैनिक या वर्गांच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी गरजेचे कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच सर्व उमेदवारांची मुलाखत झाल्यानंतर अंतिम निकाल १५ दिवसांच्या आत यूपीएससीच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल. हा निकाल वेबसाईटवर ३० दिवसांसाठी उपलब्ध राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com