NEET UG Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! NEET UG परिक्षांची तारीख जाहीर होणार; रजिस्ट्रेशन कसं करावं? जाणून घ्या

NEET UG Exam 2025 Date: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नीट परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
NEET UG Exam
NEET UG ExamSaam Tv
Published On

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नीट २०२५ च्या परिक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच नीट परिक्षेची तारीख जाहीर करणार आहे. दरवर्षी मे महिन्यात नीट परीक्षा घेतली जाते. मागच्या वर्षी नीट परिक्षेचं संपूर्ण शेड्युल सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले होते. परंतु यावर्षी नीट परिक्षेची तारीख जाहीर होण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी नीटच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. (Neet Ug Exam 2025)

NEET UG Exam
Post Office Scheme: सरकारचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत आता व्याज मिळणार नाही, तुम्हीही केली होती का गुंतवणूक?

मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते. नीट ही देशातील सर्वात अवघड परिक्षांपैकी एक आहे. या परिक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस व्हायचे असते. त्यांना ही प्रवेश परीक्षा द्यावीच लागते.

नीटच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. ही परीक्षा ७२० गुणांची असते. ही परीक्षा मे महिन्यात होते.नीट २०२५ परिक्षेची तारीख अजून जाहीर झाली नाही परंतु विद्यार्थ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. (NEET Exam Dates 2025)

NEET UG Exam
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

नीट परीक्षा अर्जप्रक्रिया (NEET Application Process)

नीट परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी nta.ac.in. या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि अधिकृत मेल आयडीवरुन रजिस्ट्रशन करायचे आहे. त्यानंतर आवश्यक माहिती भरुन तुम्हाला फी भरायची आहे. त्यानंतर परिक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला नोटिफेकशन येईल.

आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट साइज फोटो

सर्टिफिकेट

सहीचा स्कॅन फोटो

जन्मदाखला

आधार कार्ज, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

NEET UG Exam
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com