

उत्तर प्रदेशात ४६ आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्यात.
तीन विभागीय आयुक्त आणि दहा जिल्हा दंडाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.
मिर्झापूर, सहारनपूर, मेरठच्या आयुक्तांच्या बदल्या विशेष चर्चेत आहेत.
महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेशातही प्रशासकीय यंत्रणेत बदल करण्यात येत आहेत. आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जवळपास ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तीन विभागीय आयुक्त आणि १० जिल्हा दंडाधिकाऱ्यांची बदली करण्यात आलीय.
मिर्झापूर (विंध्याचल), सहारनपूर आणि मेरठच्या आयुक्तांची बदली करण्यात आलीय. हाथरस, सीतापूर, बस्ती, सिद्धार्थनगर, चित्रकूट, कौशांबी, बलरामपूर, ललितपूर, श्रावस्ती आणि रामपूर येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आलीय.
वाराणसीच्या तैनात असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांना बदलण्यात आल्या आहेत.मुख्य विकास अधिकारी, विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष, नगर आयुक्त आणि एडीएम फायनान्सला देखील बदलण्यात आलेत. आतापर्यंत विंध्याचलच्या विभागीय आयुक्त असलेल्या बाल कृष्ण त्रिपाठी यांना सामान्य प्रशासन विभाग, उत्तर प्रदेश सरकारमध्ये सचिव बनवण्यात आले आहे.
२) मत्स्यव्यवसाय महासंचालक राजेश प्रकाश हे आता विंध्याचलचे विभागीय आयुक्त असणार आहेत.
३) उत्तर प्रदेश राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव श्रीमती धनलक्ष्मी के. यांची उत्तर प्रदेशच्या मत्स्यव्यवसाय महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
४) महानिदेशक , सार्वजनिक उद्योग उत्तर प्रदेश संजय कुमार यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलीय. त्यांच्याकडे आता उत्तर प्रदेश राज्य मानवाधिकार आयोगाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय.
५)
व्यवस्थापकीय संचालक, उत्तर प्रदेश राज्य विद्युत निर्मिती महामंडळ आणि उत्तर प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रूपेश कुमार यांना आता सहारनपूरचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
६) सहारनपूर येथील विभागीय आयुक्त असलेल्या अटल कुमार राय यांना सचिव गृहविभाग उत्तर प्रदेश सरकार
७) उत्तर प्रदेश सरकारचे महसूल विभागाचे सचिव, मदत आयुक्त आणि एकत्रीकरण आयुक्त भानु चंद्र गोस्वामी आता मेरठचे विभागीय आयुक्त असणार आहेत.
८) मेरठचे विभागीय आयुक्त डॉ. हृषिकेश भास्कर यशोद यांना उत्तर प्रदेश सरकारचे महसूल विभागाचे सचिव बनवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मदत आयुक्त आणि उत्तर प्रदेशचे एकत्रीकरण आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
९) उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर माहेश्वरी यांना उत्तर प्रदेश राज्य विद्युत निर्मिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उत्तर प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.