Maharashtra IAS Transfer Today : निवडणुकीच्या तोंडावर ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

IAS Transfer list : निवडणुकीच्या तोंडावर ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज कुणाची कुठे नियुक्ती झाली, जाणून घ्या.
IAS Transfers news
IAS Transfers ListSaam tv
Published On
Summary

सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी

पर्यटन, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि पुणे महानगरपालिका विभागांमध्ये बदल

संजय खंडारे, कुनाल कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती.

विकास प्रकल्पांना गती देणे हे या फेरबदलांचे उद्दिष्ट

संजय गडदे, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सरकारने एकूण ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालय तसेच पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन विभागात नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

प्रमुख बदल्या :

संजय खंडारे (IAS: 1996) — विद्यमान प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग — यांची बदली करून त्यांची नियुक्ती प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

पराग जैन नैनुतिया (IAS: 1996) — विद्यमान प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग — यांची बदली करून नियुक्ती प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

कुनाल कुमार (IAS: 1999) — यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.

वीरेंद्र सिंग (IAS: 2006) — विद्यमान सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग — यांची बदली करून नियुक्ती सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

IAS Transfers news
Shocking : छठ पूजेदरम्यान सेल्फी घेताना होडी उलटली; तिघे तरुण नदीत बुडाले

ई. रविंद्रन (IAS: 2008) — विद्यमान मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई — यांची बदली करून नियुक्ती सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

एम. जे. प्रदीप चंद्रन (IAS: 2012) — विद्यमान अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका — यांची बदली करून नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे येथे करण्यात आली आहे.

पवनीत कौर (IAS: 2014) — विद्यमान उपमहासंचालक, यशदा, पुणे — यांची बदली करून नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे येथे करण्यात आली आहे.

IAS Transfers news
Satara News : डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातील आरोपी बदने आणि बनकरचा एकमेकांशी संबंध काय? कोर्टात काय युक्तिवाद झाला?

प्रशासनातील या फेरबदलामुळे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य आणि स्थानिक प्रशासन या क्षेत्रांतील समन्वय अधिक मजबूत होईल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलाय. मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हे बदल राज्यातील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि प्रशासनिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com