

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या नियमात महत्वाचे बदल
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित सिलिंडरच्या संख्येत केली कपात
नव्या नियमानुसार वार्षिक ४ सिलिंडरच मिळणार
नव्या नियमामुळे लाभार्थ्यांना बसणार १५०० रुपयांचा फटका
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या १०.५८ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या एलपीजी सबसिडीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारने वार्षिक अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ केली आहे. या योजनेत महत्त्वाचे बदल केल्याने सबसिडीअंतर्गत प्रत्येकी लाभार्थ्यांना १५०० रुपयांचा फटका बसणार आहे.
उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना ९ रिफिलवर ३०० रुपये प्रति सिलिंडरवर अनुदान मिळत होतं. या योजनेवर वार्षिक २७०० रुपयांचा लाभ मिळत होता. नव्या नियमाअंतर्गत आता केवळ ४ रिफिल्ससाठी प्रति सिलिंडर ३०० रुपयांचं अनुदान मिळेल. त्यामुळे वार्षिक अनुदानात १५०० रुपयांची घट होईल.
अनुदानित सिलिंडरच्या संख्येत कपात
दिल्लीत काही दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९४२ रुपये इतकी झाली आहे. नव्या नियमानुसार, उज्ज्वला लाभार्थ्यांना पहिल्या चार रिफिल्ससाठी प्रति सिलिंडरमागे ३०० रुपयांचं अनुदान मिळेल. अनुदान मिळाल्यानंतर प्रति सिलिंडरची किंमत ६४२ रुपये होईल. हे अनुदान केवळ वार्षिक ४ सिलिंडरसाठी लागू होईल. त्यानंतरचे सिलिंडर बाजाराभावानुसार मिळतील.
लाभार्थ्यांना बसणार १५०० रुपयांचा फटका
२०१६ साली या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक १२ सिलिंडरवर अनुदान मिळायचे. मागील काही वर्षात अनुदानित सिलिंडरच्या संख्येत कपात करत ९ केली. आता त्यात आणखी घट करून अनुदानित सिलिंडरची संख्या ४ केली आहे. तत्पूर्वी, ९ अनुदानित सिलिंडरमुळे वार्षिक २७०० रुपयांचा लाभ मिळायचा. आता योजनेअंतर्गत वार्षिक ४ अनुदानित सिलिंडर मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी आणि कुटुंबाचं किचन सांभाळणाऱ्या 'लाडक्या बहिणीं'ना १५०० रुपयांचा फटका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.