Patalkot Express Fire: 'द बर्निंग ट्रेन',पातालकोट एक्स्प्रेसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारून वाचवला जीव

धावत्या पातालकोट एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे.
Patalkot Express Fire
Patalkot Express FireANI/X
Published On

Patalkot Express Fire:

उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. धावत्या पातालकोट एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर ट्रेन तातडीने थांबवण्यात आली. यानंतर प्रवाशांनी उड्या मारून स्वत:चे जीव वाचवले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील ग्वालियरजवळील भांडई रेल्वे स्टेशनजवळ पातालकोट एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. पातालकोट एक्स्प्रेस फिरोजपूरहून सिवनीला चालली होती. त्याचवेळी भांडईजवळ एक्स्प्रेसच्या दोन कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Patalkot Express Fire
Hamas-Israel War: Audio Viral; 'डॅड! मी १० ज्यूंना मारलं', ज्यू कुटुंबियांची हत्या केल्यानंतर हमास दहशतवाद्याचा वडिलांना फोन

पातालकोट एक्स्प्रेसला नेमकी कशी आग लागली, याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग लागल्यानंतर आरपीएफ, जीआरपीएफसहित फायर ब्रिगेडचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

दरम्यान, पातालकोट एक्स्प्रेसच्या दोन डब्याला (कोच) आग लागल्याची घटना घडली. मात्र, या आगीची झळ इतर चार डब्याला देखील बसली. एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्यानंतर तो आग लागलेला डबा हटविण्यात आला आहे. या आगीत नेमकं किती नुकसान झालं याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.

Patalkot Express Fire
Satyapal Malik: 'मी लिहून देतो, आता मोदी सरकार पुन्हा येणार नाही'; राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिकांचं मोठं विधान

दरम्यान, आग्रा-धौलपूरदरम्यान पातालकोट एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर धूर निघू लागला. यानंतर ट्रेन तातडीने थांबविण्यात आली. या आगीच्या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नसल्याचं बोललं जातंय.

Patalkot Express Fire
Narendra Modi Visits Maharashtra: PM नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल? 7500 कोटींची विकासकामं आणि बरंच काही...

'आग्रा-ढोलपूरदरम्यान पातालकोट एक्स्प्रेसमध्ये धूर झाल्याचं वृत्त आहे. जीएस कोच, चौथ्या कोचच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं कळालं. त्यानंतर ट्रेन तातडीने थांबविण्यात आली. त्यानंतर आग लागलेला डबा वेगळा केला. या घटनेत कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com