Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Bihar Accident: बिहारमध्ये दोन कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये दोन्ही कारचा चक्काचूर झाला. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Bihar AccidentSaam Tv
Published On

Summary:

  • बिहारमध्ये दाट धुक्यांमुळे भयंकर अपघात

  • तीन वाहनं एकमेकांवर धडकली

  • टायर पंक्चर झाल्यामुळे कंटेनर महामार्गावर थांबला

  • कंटेनकरला पाठिमागून दोन कारने धडक दिली

  • अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले

बिहारमध्ये धुक्यांमुळे भयंकर रस्ते अपघात झाला. महामार्गावर ३ वाहनांनी एकमेकांना धडक दिली. बिहारची राजधानी पाटणामधील अनुमंडलमध्ये अपघाताची ही घटना घडली. दोन कारने कंटेनरला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहांचे अक्षरश: तुकडे झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुमंडलच्या अथमलगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बख्तियारपुर मोकामा फोरलेन येथील फुलेरपुर गावाजवळ हा अपघात झाला. दाट धुक्क्यामुळे दोन कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही कारमधील दोघांचा मृत्यू झाला. तर अपघातामध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये दोन्ही कारचा अक्षरश: चुराडा झाला. पोलिसांनी दोन्ही कारला कटरच्या सहाय्याने कापून मृतदेह आणि जखमी व्यक्तींना बाहेर काढले.

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ बख्तियारपुर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. रात्री १०.३० वाजता हा अपघात झाला. कंटेनर मोकामावरून पाटणाच्या दिशेने जात होता. कंटेनरचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो महामार्गाच्या मधोमध थांबला. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या भरधाव कारने कंटेनकरला धडक दिली. त्या कारला दुसऱ्या कारने धडक दिली.

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अपघातग्रस्त दोन्ही कार मोकामावरून पाटणाच्या दिशेने जात होती. हा अपघात फुलेरपुर गावाजवळ झाला. यामधील एक कार हरियाणा तर दुसरी कार बिहारची आहे. हा अपघात खूपच भयंकर होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी काही तासानंतर वाहतूक कोंडी सोडवली. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Accident: महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, दोन कारची कंटेनरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Beed Accident: मद्यधुंद कार चालकानं दोघांना उडवलं; 2 दुचाकींना धडक देत दुकानात घुसली कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com