नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; बर्फाचा भलामोठा पर्वत कोसळला; ७ गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू

7 Mountaineers Killed, 4 Missing: नेपाळच्या यालुंग री पर्वतावर मोठी दुर्घटना. सोमवारी हिमस्खलन झालं. या दुर्घटनेत सात गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू झाला.
7 Mountaineers Killed, 4 Missing
7 Mountaineers Killed, 4 MissingSaam
Published On
Summary
  • नेपाळच्या यालुंग री पर्वतावर हिमस्खलन.

  • सात गिर्यारोहकांचा मृत्यू.

  • चार जण बेपत्ता.

  • बचाव कार्य सुरू.

नेपाळच्या उत्तर पूर्व (ईशान्य) भागातील यालुंग री पर्वतावर सोमवारी सकाळी एका मोठी दुर्घटना घडली. ५,६३० मीटर उंचीच्या या शिखरावर झालेल्या हिमस्खलनात सात गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार गिर्यारोहक अजूनही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये तीन अमेरिकन, एक कॅनेडियन, एक इटालियन आणि दोन नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.

द काठमांडू पोस्टनुसार, यालुंग री पर्वतावर हिमस्खलन झाले. यालुंग री पर्वताची उंची ५,६३० इतकी असून, हे पर्वक बागमती प्रांतातील दोलखा जिल्ह्यातील रोलवालिंग व्हॅलीमध्ये स्थित आहे. सोमवारी सकाळी या पर्वतावरून हिमस्खलन झाले. हिमस्खलनामुळे अनेक गिर्यारोहक बर्फाखाली अडकले. हिमस्खलनाची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं काम पार पडलं.

7 Mountaineers Killed, 4 Missing
गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

४ गिर्यारोहक अजूनही बेपत्ता

जिल्हा पोलीस कार्यालयाचे उपअधीक्षक ज्ञामकुमार महातो यांनी सांगितले की, पर्वतावर झालेल्या हिमस्खलनामुळे एकूण ७ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. हे गिर्यारोहक इतर देशातील होते. दरम्यान, पर्यटन अधिकाऱ्यांनी समोवारी सांगितले की, खराब हवानामुळे शिखरावर चढाई करताना दोन इटालियन गिर्यारोहक बेपत्ता झाले. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. आणखी २ गिर्यारोहक बेपत्ता आहेत.

7 Mountaineers Killed, 4 Missing
'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

ट्रेकिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ नेपाळचे अध्यक्ष सागर पांडे म्हणाले की, मंगळवारी जोरदार बर्फवृष्टी झाल्यापासून एक हजारहून अधिक ट्रेकर्स आणि पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. बचाव कार्य आव्हानात्मक बनले होते. हेलिकॉप्टर ऑपरेशन्सही कठीण झाले होते. आता हवामान सुधारले. काम वेगाने सुरू आहे. बाकी गिर्यारोहकांचा शोध सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com